Hardik Pandya Mumbai Indians: IPL 2022 ची सुरूवात २६ मार्चपासून होणार आहे. यंदाच्या हंगामात १० संघ खेळणार असून हे संघ ५-५ च्या गटात विभागण्यात आले आहेत. यंदाच्या हंगामात लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स असे दोन संघ नव्याने सामील झाले आहेत. गुजरातच्या संघाचे नेतृत्व दमदार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडे आहे. हार्दिकला सुरूवातीपासून मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला. पण मेगालिलाआधी रोहित शर्मा (Rohit Sharma) नेतृत्व करत असलेल्या मुंबईने त्याला रिटेन केलं नाही. हार्दिकबद्दलचा हा निर्णय चाहत्यांसाठी धक्काच होता. पण मुंबई इंडियन्सनेहार्दिक पांड्याला रिटेन का केलं नाही? याचं खरं कारण आता समोर आलं आहे.
हार्दिक पांड्या २०१९च्या विश्वचषक स्पर्धेत संघात होता. त्यावेळी त्याला दुखापतीमुळे मध्यातूनच माघार घ्यावी लागली. त्यानंतर २०२१ला खेळण्यात आलेल्या टी२० वर्ल्ड कपमध्ये हार्दिकला संघात स्थान देण्यात आले. हार्दिकचा फिटनेस हा चिंतेचा विषय असूनही त्याला संघात स्थान मिळाले. पण त्याला त्यात चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर मात्र हार्दिक बराच काळ क्रिकेटपासून दूरच राहिला. या काळात मुंबईला चार खेळाडू रिटेन करायचे होते. एका रिपोर्टनुसार, रिटेन्शनच्या वेळी हार्दिकच्या नावाचाही विचार केला गेला होता. पण हार्दिकने त्याआधीच्या काळात फारशी गोलंदाजी केली नव्हती. आंतरराष्ट्रीय सामन्यातच नव्हे तर IPL 2021 मध्येही हार्दिकला गोलंदाजी जमली नव्हती. त्यामुळे हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने रिटेन केलं नाही असं सांगितलं जात आहे.
हार्दिक पांड्याने मुंबईच्या संघाकडून IPL खेळताना चार वेळा विजेतेपदाची चव चाखली. २०१५पासून तो मुंबईच्या संघातच होता. हार्दिक आणि कृणाल यांच्यामुळे मुंबईचा संघाचा समतोल टिकून होता. पण कालांतराने हार्दिकच्या दुखापतीमुळे मुंबईच्या अडचणीत वाढ झाली. कायम गोलंदाजीचे ५ ते ६ पर्याय घेऊन खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला हार्दिकच्या गोलंदाजीच्या सक्षमतेवर शंका असल्यानेच त्याला संघात रिटेन करण्यात आलं नाही असं सांगण्यात येतंय. तसेच, कृणाल पांड्या ढासळलेला फॉर्म हे त्याच्या करारमुक्तीचं कारण ठरल्याचंही बोललं गेलं आहे.
तसेच आधी एका रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले होते की, हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार व्हायचं होतं आणि त्याने याबाबत फ्रेंचायझी, संघ व्यवस्थापन यांनाही सांगितलं होतं. मात्र, फ्रँचायझीची त्याच्या या मतावर सहमती होऊ शकली नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याचे नाव रिटेन्शन लिस्टमध्ये समाविष्ट केले नाही.