Arjun Tendulkar IPL 2022 : Mumbai Indians चा अर्जुन तेंडुलकरवर भरवसा नाय?; मध्यप्रदेशच्या डावखुऱ्या गोलंदाजाला घेतले संघात

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात ( IPL 2022) पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians) कामगिरी अत्यंत निराशाजनक झालेली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 02:56 PM2022-04-28T14:56:09+5:302022-04-28T14:56:36+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022: Mumbai Indians don't trust Arjun Tendulkar ?; Kumar Kartikeya Singh to replace Md. Arshad Khan in Mumbai Indians 2022 squad | Arjun Tendulkar IPL 2022 : Mumbai Indians चा अर्जुन तेंडुलकरवर भरवसा नाय?; मध्यप्रदेशच्या डावखुऱ्या गोलंदाजाला घेतले संघात

Arjun Tendulkar IPL 2022 : Mumbai Indians चा अर्जुन तेंडुलकरवर भरवसा नाय?; मध्यप्रदेशच्या डावखुऱ्या गोलंदाजाला घेतले संघात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात ( IPL 2022) पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians) कामगिरी अत्यंत निराशाजनक झालेली आहे. मुंबईने आतापर्यंत झालेले आठही सामने गमावले आहेत आणि त्यामुळे त्यांचे स्पर्धेच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्याची शक्यता ०.००३% इतकीच राहिली आहे. म्हणजे त्यांच्या प्ले ऑफच्या आशा या संपल्यातच जमा आहेत. त्यामुळे उर्वरित ६ सामन्यांत युवा खेळाडूंना संधी देण्यात यावी, अशी मागणी जोर धरतेय. त्यात अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) याचे नाव आघाडीवर आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन मागील पर्वापासून मुंबई इंडियन्ससोबत आहे, परंतु त्याला एकही संधी मिळालेली नाही. यंदा तरी ती मिळेल अशी अपेक्षा असताना MI ने मध्य प्रदेशचा डावखुरा गोलंदाजाला संघात घेतले आहे.

मुंबई इंडियन्स ३० एप्रिलला डी वाय पाटील स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचा सामना करणार आहे. या लढतीत मुंबई इंडियन्स विजय मिळवेल अशी अपेक्षा आहे. अर्जुनला पदार्पणाची संधी मिळते का? याचे उत्तरही त्याच दिवशी मिळेल. मुंबई इंडियन्सने सातत्याने अर्जुनचे गोलंदाजी करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करून तसे संकेत दिलेत खरे, परंतु कार्तिकेयच्या एन्ट्रीने त्याचे पदार्पण लांबतेय का, अशा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

मुंबई इंडियन्सने मध्य प्रदेशाचा डावखुरा गोलंदाज कुमार कार्तिकेय सिंग याला (   Kumar Kartikeya Singh ) गुरुवारी आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. मुंबईचा गोलंदाज मोहम्मद अर्षद खान  ( Md. Arshad Khan ) याला दुखापतीमुळे आयपीएल २०२२मधून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्याजागी मुंबईने कुमार सिंगला करारबद्ध केले आहे.  कुमार कार्तिकेय सिंग हा मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट टीमचा सदस्य आहे आणि त्याला आता करारबद्ध करण्यात आले आहे.   

कुमार कार्तिकेय हा संथ गती डावखुरा गोलंदाज आहे आणि त्याने मध्य प्रदेशच्या तीन्ही फॉरमॅटच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१८मध्ये त्याने मध्य प्रदेशच्या संघातून पदार्पण केले होते. मुंबई इंडियन्सच्या नेट्समध्ये कार्तिकेयने त्याच्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आणि त्यामुळे त्याला संघात करारबद्ध करण्यात आले असल्याची माहिती मुंबई इंडियन्सने दिली.


 

Web Title: IPL 2022: Mumbai Indians don't trust Arjun Tendulkar ?; Kumar Kartikeya Singh to replace Md. Arshad Khan in Mumbai Indians 2022 squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.