Join us  

Wasim Jaffer Comedy Tweet, IPL 2022 MI vs CSK: मुंबई-चेन्नई सामन्याआधी वासिम जाफरचं 'करण-अर्जुन' चित्रपटातलं मजेशीर ट्वीट

मुंबई-चेन्नई यांच्यात आज सामना; दोन्ही संघांना विजयाची आवश्यकता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 6:48 PM

Open in App

IPL 2022: स्पर्धेत आज मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध होणार आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. असं असलं तरी, गुणतालिकेतील स्थिती पाहता आजचा सामना हा दोन्ही संघांसाठी 'करो या मरो'चा असणार आहे. तशातच भारताचा माजी कसोटीपटू वसीम जाफर याने चेन्नई आणि मुंबई यांच्यातील सामन्यासंदर्भात एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. ही व्हिडिओ क्लिप 'करण अर्जुन' या बॉलिवूड चित्रपटातील 'ये बंधन तो' या गाण्यावरून घेण्यात आली आहे. जाफरने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मुंबई इंडियन्स, सीएसके आणि स्टार स्पोर्ट्स हे आज रात्री असे दिसतील.' पाहा त्याची मजेशीर पोस्ट-

मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) या दोन यशस्वी आयपीएल संघांमधील झुंज कायमच महत्त्वाची असते. आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ३२ सामने खेळले गेले आहेत. त्यात मुंबईने चेन्नईला १९ वेळा पराभूत केले आहे. तर CSKने १३ सामने जिंकले आहेत. गेल्या मोसमाबद्दल बोलायचे झाले, तर दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला होता.

पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने IPL 2022 मध्ये आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत आणि अजूनही त्यांना पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. रोहितचा मुंबई संघ सध्या तळाशी आहे. तसेच, त्यांचा रनरेटही खूप वाईट आहे. याशिवाय चार वेळा चॅम्पियन झालेल्या चेन्नई सुपर किंग्जची स्थितीही फारशी चांगली नाही. रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील CSK संघाने आतापर्यंत ६ पैकी फक्त एक सामना जिंकला आहे आणि तो नवव्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सरोहित शर्मा
Open in App