IPL 2022 Schedule, Double Header Matches : यंदाच्या स्पर्धेत रंगणार 'इतके' डबल हेडर सामने; खेळाडूंना करावी लागणार RT-PCR टेस्ट!

IPL 2022 च्या सामन्यांना २६ मार्चपासून होणार सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 07:03 PM2022-03-02T19:03:08+5:302022-03-02T19:03:22+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 new format schedule double header matches updates corona test details Mumbai Indians Pune | IPL 2022 Schedule, Double Header Matches : यंदाच्या स्पर्धेत रंगणार 'इतके' डबल हेडर सामने; खेळाडूंना करावी लागणार RT-PCR टेस्ट!

IPL 2022 Schedule, Double Header Matches : यंदाच्या स्पर्धेत रंगणार 'इतके' डबल हेडर सामने; खेळाडूंना करावी लागणार RT-PCR टेस्ट!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, Double Header Matches : IPL 2022 स्पर्धेची सुरूवात २६ मार्चपासून होणार आहे. त्यासाठी हळूहळू संघ तयारी करू लागले आहेत. बुधवारी महाराष्ट्र सरकार आणि IPL शी संबंधित अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. त्यात IPL संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी मुंबईत एकूण ५५ सामने होणार आहेत. त्यामुळे ८ मार्चपासून संघ मुंबईत पोहोचण्यास सुरुवात करणार आहेत. यानंतर सक्तीचं क्वारंटाइन होणार असेल. त्यानंतर १४ ते १५ मार्चपासून आयपीएल संघ सरावाला सुरूवात करणार आहेत.

ANI च्या वृत्तानुसार, आयपीएल खेळण्यासाठी येणाऱ्या सर्व खेळाडूंना ३ ते ५ दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. मुंबईला जाण्यापूर्वी प्रत्येकाला RTPCR चाचणी स्वतःच्या घरी करून घ्यावी लागणार आहे. आयपीएल खेळण्यासाठी येणाऱ्या सर्व खेळाडूंना ३ ते ५ दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. मुंबईला जाण्यापूर्वी प्रत्येकाला RTPCR चाचणी स्वतःच्या घरी करून घ्यावी लागेल.

१२ डबल हेडर होण्याची शक्यता

ठाण्यातील रिलायन्स कॉर्पोरेट पार्क, MCA मैदानावर संघांना सरावाची संधी दिली जाणार आहे. कारण आयपीएलचे सर्व साखळी सामने केवळ चार स्टेडियममध्ये खेळवले जाणार असल्याने संघांना सरावासाठी स्वतंत्र सुविधा देण्यात आल्या आहेत. आयपीएलमध्ये एकूण ७० लीग सामने खेळले जाणार आहेत. त्यात एकूण १२ डबल हेडर (एकाच दिवशी दोन सामने) असू शकतात अशी शक्यता आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर २० सामने होणार आहेत, तर १५ सामने CCI स्टेडियमवर होणार आहेत. याशिवाय डी वाय पाटील स्टेडियमवर २० सामने होणार आहेत. तर पुण्यातील MCA स्टेडियमवर एकूण १५ सामने होणार आहेत. यावेळी आयपीएलमध्ये एकूण १० संघ सहभागी होत असून त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटामध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्स हे संघ आहेत. तर ब गटात चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांचा समावेश आहे.

Web Title: IPL 2022 new format schedule double header matches updates corona test details Mumbai Indians Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.