Join us  

IPL 2022 New Rules and Format : पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलचे नवीन नियम; जेतेपदाची शर्यत आणखी रंगतदार!

IPL 2022 New Rules and Format: इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वात १० संघ मैदानावर उतरणार असल्याचे बीसीसीआयनं स्पष्ट केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2021 9:19 PM

Open in App

IPL 2022 New Rules and Format: इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वात १० संघ मैदानावर उतरणार असल्याचे बीसीसीआयनं स्पष्ट केले आहे. दोन नव्या संघांसाठी बीसीसीआयनं नुकतेच टेंडरही मागवले असून लखनौ व अहमदाबाद या दोन नव्या फ्रँचायझींची चर्चा आहे. आता दोन नवीन संघ आले की लीगचा फॉरमॅटही बदलणार आहे. २०११मध्येही दहा संघ खेळले होते आणि २०२२चा फॉरमॅटही त्याला मिळताजुळता असेल... आता ८ संघांमध्ये ६० सामने खेळवले जातात, परंतु पुढील वर्षी चार प्ले ऑफ लढतींसोबत ७४ सामने खेळवण्यात येतील.  

विराट कोहलीकडून झालीय चूक; OUT असूनही मोईन अली खेळतोय, इंग्लंडनं घेतली आघाडी

सध्याच्या फॉरमॅटनुसार प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध होम-अवे असे १४ सामने खेळतो. त्यामुळे दोन नवे संघ सहभागी झाल्यानंतर फ्रँचायझींना त्यांच्या घरच्या मैदानावर खेळायला मिळेल, याची शक्यता कमी आहे.''आम्हाला होम-अवे सामने खेळवणे अवघड आहे आणि कारण त्यानुसार ९४ सामने खेळवावे लागतील. आंतरराष्ट्रीय वेळापत्रकानुसार एवढी मोठी विंडो मिळणे कठीण आहे. त्यामुळे २०११च्या जुन्या फॉरमॅटनुसारच आयपीएल २०२२ खेळवली जाईल,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं TOI ला सांगितले.

 असे असतील नवे नियम ( IPL 2022 New Rules and Format)

  • २०११मध्ये १० संघ खेळले होते आणि तोच फॉरमॅट २०२२मध्येही असेल. 
  • दहा संघांनी दोन प्रत्येकी पाच-पाच अशा दोन गटांत विभागणी करण्यात येईल
  • गटातील प्रत्येक संघ एकमेकांशी दोन आणि दुसऱ्या गटातील संघाशी एक असे सामने खेळतील
  • साखळी फेरीत प्रत्येक संघ १४ सामने खेळतील. विजयी संघाला दोन गुण मिळतील, तर सामना अनिर्णीत राहिल्या दोन्ही संघांना प्रत्येकी १-१गुण दिला जाईल.

 प्ले ऑफचे चार सामने  

  • क्वालिफायर १ - साखळी फेरीत पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये
  • एलिमिनेटर - तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये
  • क्लालिफायर २ - क्वालिफायर १मधील पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटर मधील विजयी संघ
  • अंतिम सामना - क्वालिफायर १ विरुद्ध क्वालिफायर २  
टॅग्स :आयपीएल २०२१बीसीसीआय
Open in App