IPL 2022 New Teams: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( BCCI) नं इंडियन प्रीमिअर लीग २०२२साठी ( IPL 2022) दोन नव्या संघांसाठी टेंडर मागवले आहे. अदानी ग्रूप, RPG संजीव गोएंका ग्रूप, टोरेंट फार्मा कंपनी यांची नावं चर्चेत आहेत आणि या टेंडरसाठी ५ सप्टेंपूर्वी अर्ज करावा लागणार आहे. ( BCCI sets October 5 deadline for submitting tender) या मुदतीपूर्वी इच्छुकांना सर्व कागदपत्रं जमा करावी लागतील, असे बीसीसीआयनं प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. २०११नंतर प्रथमच आयपीएलमध्ये दहा संघ खेळणार आहेत. ( It will be the first time since 2011 that ten teams will participate in the T20 league)
इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वात ८ ऐवजी १० संघ खेळणार आहेत. सुरूवातीला नव्या संघाची मुळ किंमत ही १७०० कोटी असावी असा विचार सुरू होता, परंतु आता ती २००० कोटी ठेवण्यात आली आहे. पण, बीसीसीआयला एक संघ ३ ते ३५०० कोटींना विकला जाईल, अशी अपेक्षा आहे. या लिलावाची कागदपत्रांसाठी बोली लावणाऱ्या व्यक्तीला १० लाख रुपये भरावे लागतील आणि ते परत केले जाणार नाहीत. ( For the time being, the interested parties will have to purchase bid documents at a non-refundable fee of Rs 10 lakh.)