No Ball Controversy Rishabh Pant, IPL 2022 DC vs RR: दिल्ली विरूद्धच्या सामन्यात राजस्थानने १५ धावांनी विजय मिळवला. राजस्थानच्या जोस बटलरने हंगामातील तिसरे शतक झळकावत संघाला २२२ धावांपर्यंत मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात खूप मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळाला. शेवटच्या षटकात ३६ धावांची गरज असताना पहिल्या तीन चेंडूवर फलंदाजाने षटकार लगावले. त्यातील तिसरा चेंडू फुलटॉस कमरेच्या वर होता, त्यामुळे तो नो बॉल असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. पण पंचांनी मात्र तो नो बॉल दिला नाही. त्यामुळे दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत प्रचंड संतापला. घडलेल्या प्रकारानंतर याची बरीच चर्चा झाली. आता सामना संपल्यानंतरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून फॅन्स पंतला, अंपायरला मारण्यास सांगत असल्याचं दिसत आहे.
दिल्ली संघाला शेवटच्या षटकांत ३६ धावांची गरज होती. ओबेड मॅकॉयच्या पहिल्या तीन चेंडूंवर रॉवमन पॉवेलने षटकार खेचला, पण तिसऱ्या चेंडूला 'नो-बॉल' न दिल्याने दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत संतापला आणि त्याने आपल्या खेळाडूंना मैदानाबाहेर बोलावण्यास सुरुवात केली. सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे हावभावाने 'नो-बॉल' तपासण्यास सांगत होते, त्यामुळे सामना काही काळ थांबला होता. सामन्यानंतरही पंत आणि अंपायर यांच्यात वाद झाल्याचे दिसून आले. त्यावेळी फॅन्सने वरतून ओऱडून, 'मारो रिषभ भाई.. (अंपायर को) मारो...'; असं सांगितल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, या प्रकारानंतर पंचांच्या चुकीच्या निर्णयावरून टीकेची झोड उठली. परंतु IPL नियमन समितीने पंचांवर कोणतीही कारवाई केली नाही. मात्र, रिषभ पंत, शार्दुल ठाकूर यांना गैरवर्तणुकीसाठी दंड ठोठवला. तर कोचिंग स्टाफमधील प्रवीण अमरे यांना एका सामन्याची बंदी घालण्यात आली. तसेच, IPL ने ठरवलेल्या नियमावलीनुसार, कमरेच्या वर फुलटॉस चेंडू असेल, आणि फलंदाज बाद तरच थर्ड अंपायर त्यात हस्तक्षेप करू शकतो. पण वाद झालेला चेंडू मात्र षटकार होता, त्यामुळे तिसऱ्या पंचाची मदत घेता आली नाही, असं समजले.
Web Title: Ipl 2022 no ball controversy rishabh pant angry chat with umpires cricket fans video viral dc vs rr
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.