Join us  

IPL 2022 Opening Ceremony: क्रिकेटच्या मैदानावर टोक्यो ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा सत्कार, Neeraj Chopraला मिळणार १ कोटी अन्... 

IPL 2022 Opening Ceremony: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज सायंकाळी ७.३० वाजल्यापासून इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाचा शुभारंभ होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 4:42 PM

Open in App

IPL 2022 Opening Ceremony: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज सायंकाळी ७.३० वाजल्यापासून इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाचा शुभारंभ होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( CSK vs KKR) या दोन संघांमध्ये सलामीचा सामना रंगणार आहे. तत्पूर्वी, क्रिकेटच्या मैदानावर टोक्यो ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंचा BCCIकडून सत्कार होणार आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रासह ( Neeraj Chopra) सर्व पदक विजेत्या खेळाडूंना गौरविण्यात येणार आहे. 

मागील वर्षी BCCIने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना रोख रक्कम देण्याची घोषणा केली होती. पण, हा सोहळा कधी होईल, हे त्यांनी जाहीर केले नव्हते. पण, आयपीएल २०२२ला सुरूवात होण्यापूर्वी या खेळाडूंना ही रोख रक्कम दिली जाणार आहे. देशाला २००८नंतर पहिले वैयक्तिक व १२५ वर्षांच्या इतिहासात अॅथलेटिक्समधील पहिले सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राला १ कोटी रुपये देऊन गौरविणार आहे. 

रौप्यपदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू व कुस्तीपटू रवी दहिया यांना प्रत्येकी ५० लाख दिले जातील. चानू व्यग्र वेळापत्रकामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही. कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पूनिया, बॉक्सर लवलिना बोर्गोहाई आणि बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू यांना प्रत्येकी २५ लाख दिले जातील. याशिवाय ४१ वर्षांनंतर भारताला हॉकीत पदक जिंकून देणाऱ्या पुरुष हॉकी संघाला १.२५ कोटी दिले जाणार आहेत. महिला हॉकी संघाचाही सत्कार केला जाणार आहे.  

सलग चौथ्या वर्षी बीसीसीआय आयपीएलचा उद्घाटन सोहळा घेणार नाही. २०१८मध्ये अखेरचा उद्घाटन सोहळा रंगला होता.  २०१९मध्ये पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर हा सोहळा न घेण्याचा निर्णय घेतला गेला होता आणि त्यानंतर २०२० व २०२१मध्ये कोरोना व्हायरस व लॉकडाऊनमुळे ओपनिंग सेरेमनी झाली नाही. यासाठी बीसीसीआय जवळपास ४०-४५ कोटी खर्च कररत होती.   

टॅग्स :आयपीएल २०२२बीसीसीआयटोकियो ऑलिम्पिक 2021नीरज चोप्रा
Open in App