IPL 2022 PBKS vs CSK Live Updates: चेन्नईची प्रथम गोलंदाजी; पंजाबने शाहरूख खानसह तिघांना बसवलं संघाबाहेर

चेन्नईच्या संघात बदल नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 07:33 PM2022-04-25T19:33:09+5:302022-04-25T19:55:06+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 PBKS vs CSK Live Updates Chennai won the toss and elected to bowl first Punjab Kings made 3 Changes Shahrukh Khan Out MS Dhoni Ravindra Jadeja | IPL 2022 PBKS vs CSK Live Updates: चेन्नईची प्रथम गोलंदाजी; पंजाबने शाहरूख खानसह तिघांना बसवलं संघाबाहेर

IPL 2022 PBKS vs CSK Live Updates: चेन्नईची प्रथम गोलंदाजी; पंजाबने शाहरूख खानसह तिघांना बसवलं संघाबाहेर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shahrukh Khan, IPL 2022 PBKS vs CSK Live Updates: पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरूद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मैदानावर नंतरच्या डावात दव पडण्याची शक्यता असल्याचे सांगत त्याने आपल्या निर्णयाचे समर्थन केले. चेन्नईने मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरूद्ध जिंकलेल्या संघात एकही बदल केला नाही. पण पंजाबच्या संघाने मात्र संघात तीन महत्त्वाचे बदल केले. शाहरूख खानसह नॅथन एलिस आणि वैभव अरोरा यांना संघाबाहेर करण्यात आले. तर संदीप शर्मा, भानुका राजपक्षे आणि रिषी धवन या तिघांना संघात स्थान देण्यात आले.

चेन्नई सुपर किंग्ज- ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मिचेल सँटनर, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी (विकेटकीपर), ड्वेन ब्राव्हो, ड्वेन प्रिटोरियस, मुकेश चौधरी, महेश तिक्षणा.

पंजाब किंग्ज- मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, भानुका राजपक्षे, लियम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), ऋषी धवन, कगिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, संदीप शर्मा.

Web Title: IPL 2022 PBKS vs CSK Live Updates Chennai won the toss and elected to bowl first Punjab Kings made 3 Changes Shahrukh Khan Out MS Dhoni Ravindra Jadeja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.