Join us  

IPL 2022 Player Auction list announced : नोंदणी केलेल्या १२१४ खेळाडूंपैकी फक्त ५९० खेळाडूंवर बोली लागणार; पाहा अंतिम यादीतून कोणाचा पत्ता झाला कट

IPL 2022 Player Auction list announced - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठीच्या Mega Auction साठी आयोजकांनी अंतिम यादी मंगळवारी जाहीर केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2022 3:10 PM

Open in App

IPL 2022 Player Auction list announced - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठीच्या Mega Auction साठी आयोजकांनी अंतिम यादी मंगळवारी जाहीर केली. IPL 2022  Mega Auction साठी नोंदणी केलेल्या १२१४ खेळाडूंपैकी केवळ ५९० खेळाडूंच्या नावांचा समावेश अंतिम यादीत करण्यात आला आहे. बंगळुरू येथे १२ व १३ फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. 

नोंदणी केलेल्या खेळाडूंमध्ये ८९६ भारतीय आणि ३१८ विदेशी खेळाडूंचा समावेश होता. त्यापैकी २७० कॅप्ड (राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणारे), ९०३ अनकॅप्ड, आणि ४१ सहयोगी देशाच्या खेळाडूंनी नावे नोंदविली होती.  त्यात ७० विदेशी खेळाडू असतील. पण, आता यातून फक्त ५९० खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे.  

चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि टीम अहमदाबाद आदी १० संघ यावेळी लिलावात उतरणार आहेत. फॅफ ड्यू प्लेसिस, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, कागिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डी कॉक, जॉनी बेअरस्टो, जेसन होल्डर, ड्वेन ब्राव्हो, शाकिब अल हसन, वनिंदू हसरंगा, आदी खेळाडूंवर सर्वाधिक बोली लागण्याची शक्यता आहे.  

भारताच्या श्रेयस  अय्यर, शिखर धवन, आर अश्विन, मोहम्मद शमी, इशान किशन, अजिंक्य रहाणे, सुरेश ऱैना, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, दीपक चहर, इशांत शर्मा, उमेश यादव, आदी खेळाडूंसाठी चढाओढ आहे.  

२ कोटी मुळ किंमत असलेल्या ब्रॅकेटमध्ये ४८ खेळाडूंचा समावेश केला गेला आहे, तर १.५ कोटी व १ कोटी मुळ किंमतीच्या ब्रॅकेटमध्ये अनुक्रमे २० व ३४ खेळाडू आहेत. सध्या सुरू असलेल्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप संघातील सदस्य यश धूल, विकी ओत्सवाल, राजवर्धन हंगर्गेकर यांच्यासह देवदत्त पडिक्कल, हर्षल पटेल, कृणाल पांड्या, शाहरूख खान, दीपक हुडा, आवेश खान, आदी युवा खेळाडूंसाठीही चुरस रंगताना दिसेल. या ५९० खेळाडूंमध्ये ३७० भारतीय आणि २२० परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.  

अंतिम यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

जाणून घ्या कोणत्या देशातील किती खेळाडूअफगाणिस्तान - १७ऑस्ट्रेलिया - ४७बांगलादेश - ५इंग्लंड - २४आयर्लंड - ५न्यूझीलंड  २४दक्षिण आफ्रिका - ३३श्रीलंका - २३वेस्ट इंडिज- ३४झिम्बाब्वे - १नामिबिया - ३नेपाळ - १ स्कॉटलंड २अमेरिका - १ 

 

टॅग्स :आयपीएल २०२१आयपीएल लिलाव
Open in App