Sai Sudharsan IPL 2022 : कंट्रोल नाही राहिला... फलंदाज सामना सोडून 'टॉयलेट ब्रेक'साठी पळाला; सामना थांबवावा लागला, Video

सामना सुरू असताना खेळाडूंना टॉयलेटला जायची वेळ आली तर, ते कसे मॅनेज करत असतील?, हा प्रश्न अनेकदा सर्वांच्या मनात कधी ना कधी आला असेलच.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 03:49 PM2022-04-09T15:49:30+5:302022-04-09T15:50:28+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 , Players forced to wait on ground as IPL debutant Sai Sudharsan takes “toilet break” during GT vs PBKS match, Watch Video  | Sai Sudharsan IPL 2022 : कंट्रोल नाही राहिला... फलंदाज सामना सोडून 'टॉयलेट ब्रेक'साठी पळाला; सामना थांबवावा लागला, Video

Sai Sudharsan IPL 2022 : कंट्रोल नाही राहिला... फलंदाज सामना सोडून 'टॉयलेट ब्रेक'साठी पळाला; सामना थांबवावा लागला, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 IPL 2022, GT vs PBKS : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये काल झालेल्या लढतीत गुजरात टायटन्सने ( Gujarat Titans) चुरशीच्या लढतीत पंजाब किंग्सवर ( Punjab Kings) विजय मिळवला. राहुत तेवातियाने ( Rahul Tewatia) अखेरच्या दोन चेंडूंवर षटकार खेचून गुजरातला रोमहर्षक विजय मिळवून दिला. या सामन्यातून पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शन ( SAi Sudharsan) याच्याकडून एक विचित्र प्रकार घडला आणि त्यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला. 

नेमकं काय घडलं?
सामना सुरू असताना खेळाडूंना टॉयलेटला जायची वेळ आली तर, ते कसे मॅनेज करत असतील?, हा प्रश्न अनेकदा सर्वांच्या मनात कधी ना कधी आला असेलच. क्रिकेटच्या मैदानावर असा प्रसंग घडला तर क्षेत्ररक्षणासाठी बदली खेळाडू मैदानावर उतरवून एखादा खेळाडू हा ब्रेक घेतो, परंतु जर फलंदाजावर अशी वेळ आली तर... गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात शुक्रवारी खेळवल्या गेलेल्या लढतीत हा प्रसंग घडला.  त्यामुळे सामना थांबवावा लागला. 

गुजरात टायटन्सचा फलंदाज साई सुदर्शनने अचानक  टॉयलेट ब्रेक घेतला. गुजरातच्या डावातील ८व्या षटकाच्या शेवटी हा प्रसंग घडला. तो धावत पेव्हेलियनमध्ये गेला आणि प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू, सहकारी शुबमन गिल आणि अम्पायर त्याची वाट पाहत उभे राहिले.  


लाएम लिव्हिंगस्टोन ( ६४), शिखर धवन ( ३५), जितेश शर्मा ( २३) व राहुल चहर ( २२*) यांच्या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने ९ बाद ८९ धावा केल्या. गुजरातच्या गोलंदाजांनी अखेरच्या ५ षटकांत टिच्चून मारा केला. त्यांनी केवळ ३७ धावा देताना चार विकेट्स या पाच षटकांत काढल्या. पदार्पणवीर दर्शन नळकांडेने सलग दोन विकेट्स घेतल्या, तर राशिद खानने २२ धावांत ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात शुबमन गिलने ९६ धावांची खेळी केली. सुदर्शनने ( ३५) दुसऱ्या विकेटसाठी गिलसोबत ६८ चेंडूंत १०१ धावांची भागीदारी केली.   २ चेंडूंत १२ धावा हव्या असताना राहुल तेवातियाने दोन खणखणीत षटकार खेचले व गुजरातने ६ विकेट्स राखून विजय मिळवला.  

Web Title: IPL 2022 , Players forced to wait on ground as IPL debutant Sai Sudharsan takes “toilet break” during GT vs PBKS match, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.