IPL 2022 Start from 26th March : इंडियन प्रीमिअर लीगचे १५वे पर्व २६ मार्चपासून सुरू होत आहे. दोन वर्षांनंतर प्रथमच संपूर्ण आयपीएल भारतात खेळवली जाणार आहे. मागच्या वर्षी झालेल्या चुकांतून धडा घेत, यंदा BCCI ने आयपीएलच्या साखळी फेरीचे सर्व सामने महाराष्ट्रात खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईच्या वानखेडे व ब्रेबॉर्न स्टेडियमवर, नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर आणि पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर साखळी फेरीतील ७० सामने खेळवण्यात येणार आहेत. पण, महाराष्ट्रात सामन्यांच्या आयोजनामुळे काही फ्रँचायझींमध्ये नाराजीचा सूर असल्याचे वृत्त समोर आले होते. मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) पथ्यावर पडणारा हा निर्णय असल्याची कुजबूज सुरू झाली होती. त्यावर मुंबई इंडियन्सचा संचालक ( director of cricket operations) झहीर खान ( Zaheer Khan) याने सडेतोड मत व्यक्त केले आहे.
२६ मार्च, २०२२ ला ही लीग सुरू होणार असून २९ मे, २०२२ला अंतिम सामना खेळवण्यात येईल. मुंबई आणि पुणे येथील चार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियम्सवर साखळी फेरीचे ७० सामने खेळवण्यात येणार आहेत. प्ले ऑफच्या सामन्यांचा निर्णय नंतर घेतला जाईल. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम आणि नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर प्रत्येकी २०, तर ब्रेबॉर्न व पुण्यातील स्टेडियमवर प्रत्येकी १५ सामने होणार आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ ठरणार आहे की ज्याला घरच्या मैदानावर खेळता येणार आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली MI चार सामने वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. मुंबई इंडियन्सला साखळी सामने महाराष्ट्रात होत असल्याचा फायदा मिळणार का?, या प्रश्नावर झहीर खान म्हणाला, कोणत्याही संघाला फायदा होणार नाही किंवा कोणाचीही गैरसोय होणार नाही. मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर खेळणार हे जरी खरे असले तरी आमचे सर्व सामने वानखेडे स्टेडियमवर नाहीत. सर्व संघांना सर्व स्टेडियमवर समान सामने खेळायचे आहेत. त्यामुळे सर्व संघांसाठी समान संधी आहे.''
Mumbai Indians IPL 2022 Time Table
- २७ मार्च - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
- २ एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, डी वाय पाटील स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
- ६ एप्रिल - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- ९ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- १३ एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- १६ एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स , ब्रेबॉर्न स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
- २१ एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- २४ एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- ३० एप्रिल - राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- ६ मे - गुजरात टायट्सन विरुद्ध मुंबई इंडियन्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- ९ मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- १२ मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- १७ मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
- २१ मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून