IPL 2022 Playoffs Scenario after PBKS beat GT : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाच्या प्ले ऑफ आणि फायनलचे वेळापत्रक आजच बीसीसीआयने जाहीर केले. आयपीएल २०२२ची फायनल अहमदाबाद येथे २९ मे ला खेळवण्यात येईल, तर प्ले ऑफ व एलिमिनेटर २४ व २६ मे ला कोलकाता येथे खेळवण्यात येणार आहे. दुसरी प्ले ऑफ २७ मे ला अहमदाबाद येथे होईल. पण, प्ले ऑफच्या या शर्यतीची चुरस आता वाढत चालली आहे. साखळी सामन्याच्या अंतिम टप्प्यातील सामने जवळ येत असताना यातील चढाओढ अधिक रंजक होताना दिसतेय... त्यात पंजाब किंग्सने ( Punjab Kings) आज गुजरात टायटन्सला ( Gujarat Titans) पराभूत करून हे प्ले ऑफचं गणित अधिक किचकट केले आहे.
विजयासाठी ३० चेंडूंत २७ धावांची गरज असताना लाएम लिव्हिंग्सोटनने १६व्या षटकात मोहम्मद शमीची धुलाई केली आणि २८ धावा चोपून काढल्या. पंजाबने ८ विकेट्स व २४ चेंडू राखून हा सामना जिंकला. धवन ५३ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ६२ धावांवर नाबाद राहिला, तर लिव्हिंग्स्टोनने १० चेंडूत २ चौकार व ३ षटकारांसह ३० धावांची नाबाद खेळी केली. पंजाबने १६ षटकांत २ बाद १४५ धावा करून विजय पक्का केला.
या निकालानंतर गुणतालिकेती परिस्थिती
- गुजरात टायटन्स - १० सामने , ८ विजय, १६ गुण, ०.१५८ नेट रन रेट
- लखनौ सुपर जायंट्स - १० सामने , ७ विजय, १४ गुण, ०.३९७ नेट रन रेट
- राजस्थान रॉयल्स - १० सामने , ६ विजय, १३ गुण, ०.३४० नेट रन रेट
- सनरायझर्स हैदराबाद - ९ सामने , ५ विजय, १० गुण, ०.४७१ नेट रन रेट
- पंजाब किंग्स - १० सामने , ५ विजय, १० गुण, - ०.२२९ नेट रन रेट
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - १० सामने , ५ विजय, १० गुण, - ०.५५८ नेट रन रेट
- दिल्ली कॅपिटल्स - ९ सामने , ४ विजय, ८ गुण, ०.५८७ नेट रन रेट
- कोलकाता नाईट रायडर्स - १० सामने , ४ विजय, ८ गुण, ०.०६० नेट रन रेट
- चेन्नई सुपर किंग्स - ९ सामने , ३ विजय, ६ गुण, - ०.४०७ नेट रन रेट
- मुंबई इंडियन्स - ९ सामने , १ विजय, २ गुण, - ०.८३६ नेट रन रेट
गुजरात टायन्स, लखनौ सुपर जायंट्स व राजस्थान रॉयल्स यांचे प्ले ऑफमधील स्थान पक्के आहे. गुजरात व लखनौ यांना प्रत्येकी १, तर राजस्थानला चारपैकी २ सामने जिंकावे लागतील. आता लढत तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी आहे. पंजाबने विजय मिळवून या शर्यतीत उडी मारली आहे. त्यामुळे SRH, RCB व PBSK यांच्यात शर्यत होणार आहे. सनरायझर्स हैदराबादचे पारडे जड आहे कारण त्यांच्या हातात आणखी ५ सामने आहेत. चेन्नई सुपर किंग्सने उर्वरित पाचही सामने जिंकले तर ते प्ले ऑफमध्ये येतील. दिल्ली व कोलकाता यांनाही उर्वरित सामने जिंकून प्ले ऑफमध्ये एन्ट्री मारता येईल.