IPL 2022 Playoffs scenario RR vs CSK Live Updates : इंडियन प्रीमिअर लीग २०२२ च्या प्ले ऑफमधील दोन संघ निश्चित झाले आहेत. गुजरात टायटन्स ( GT ) व लखनौ सुपर जायंट्स ( LSG) यांनी प्ले ऑफमधील स्थान पक्के केले आहे. २० गुणांसह गुजरातने क्वालिफायर १ मधील जागा निश्चित केली आहे. आता उर्वरित दोन स्थानांसाठी आणि अव्वल दोन स्थानात जागा पटकावण्याची शर्यत सुरू आहे. अशात चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings ) विरुद्ध राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals ) यांच्यात आज होणारा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. CSK vs RR या लढतीचे गतविजेत्यांच्या दृष्टीने फार महत्त्व नसले तरी ते समीकरण बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. CSK चे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सला २०१८नंतर प्रथमच प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी आज विजय मिळवणे गरजेचा आहे. आज जर RR ने चेन्नईवर मोठ्या फरकाने विजय मिळवल्यास, ते फक्त प्ले ऑफसाठी पात्र ठरणार नाहीत, तर टॉप टू मधील स्थानही पक्के करू शकतील. मग २४ मे रोजी क्वालिफायर १ मध्ये कोलकाता येथे गुजरात टायटन्सविरुद्ध त्यांचा सामना होईल.
पण, आज जर ते विजय मिळवण्यात अपयशी ठरले, तर त्यांचा नेट रन रेट खाली येईल आणि अशा परिस्थिती त्यांना तिसऱ्या क्रमांकावरून प्ले ऑफमध्ये प्रवेश करावा लागेल. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूने १६ गुणांची कमाई केली आहे. राजस्थानने आज मोठ्या फरकाने पराभव पत्करला तर त्यांच्या स्थानाला धोका पोहचू शकतो. RR चा नेट रन रेट ०.३०४ इतका आहे, तर RCBचा -०.२५३ असा आहे. RR चा नेट रन रेट RCB पेक्षा खाली जाण्याची शक्यता कमीच आहे, परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकते.
लखनौ सुपर जायंट्सने प्ले ऑफमध्ये स्थान पक्के केले आहे. त्यात RR आज पराभूत झाल्यास LSGचे अव्वल दोनमधील स्थान पक्के होईल आणि ते क्वालिफायर १मध्ये खेळतील. RR ने विजय मिळवल्यास LSG ची तिसऱ्या क्रमांकावर घसरण होईल. चौथ्या क्रमांकासाठी RCB व DC यांच्यात चुरस आहे. मुंबई इंडियन्सने अखेरच्या साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केले. तर RCB प्ले ऑफसाठी पात्र ठरेल. पण, दिल्ली जिंकल्यास ते १६ गुण व उत्तम नेट रन रेटसह प्ले ऑफमध्ये जातील. RCB बाहेर पडेल.
Web Title: IPL 2022 Playoffs scenario : How will the outcome of RR vs CSK match affect Lucknow, Bangalore and Delhi?; the playoffs scenario will change
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.