IPL 2022 Playoffs Scenario RCB vs GT Live Updates : इंडियन प्रीमिअर लीग २०२२ चा ६७ वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore ) व टेबल टॉपर गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) यांच्यात होणार आहे. १३ सामन्यांत १० विजय मिळवून २० गुणांसह गुजरातने प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे आणि शिवाय ते अव्वल स्थानावर राहणार आहेत. त्यामुळे २४ मे रोजी होणाऱ्या क्वालिफायर १ साठी गुजरात पात्र ठरला आहे. पण, RCBचं काय?; प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी आज विजय मिळवणे, हाच एक पर्याय त्यांच्यासमोर आहे. पण, या सामन्यातील निकालाचा परिणाम राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद यांच्यावरही होणार आहे.
- राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) : RCB ने आज विजय मिळवल्यास राजस्थानला प्ले ऑफमधील जागा पक्की करण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल. त्यांचा अखेरचा साखळी सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध शुक्रवारी होणार आहे. पण, आज जर गुजरात टायटन्स जिंकले, तर प्ले ऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या तिसऱ्या संघाचा मान RR ला मिळेल. RCBचा पराभव झाल्यास ते RRच्या १६ गुणांची बरोबरी करू शकत नाहीत. अशात दिल्ली कॅपिटल्सने अखेरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला, तर RCBचे आव्हान संपुष्टात येईल. दिल्लीचा नेट रन रेट हा RCB पेक्षा चांगला आहे.
- दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) : दिल्ली कॅपिटल्सलाही स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी RCB चा पराभव महत्त्वाचा आहे. मग, दिल्लीला अखेरच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सवर विजय पुरेसा आहे. पण, जर RCB ने आज विजय मिळवला, तर दिल्लीला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. नेट रन रेट वर सर्व गणित अवलंबून असेल. आज RCB हरली आणि DC लाही हार मानावी लागली, तर दोघांचे समान १४ गुण होतील आणि उत्तम नेट रन रेट असलेला संघ चौथ्या स्थानासह प्ले ऑफमध्ये प्रवेश करेल.
- पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद ( Punjab Kings and Sunrisers Hyderabad) : आज RCB जिंकल्यास पंजाब किंग्स व सनरायझर्स हैदराबाद यांचे स्पर्धेतील आव्हान अखेरच्या साखळी सामन्यापूर्वीच संपुष्टात येईल. या दोघांच्या खात्यात प्रत्येकी १२ गुण आहेत. पण, गुजरात जिंकल्यास पंजाब व हैदराबाद यांना अखेरची संधी मिळू शकते. मात्र, त्यांना दिल्लीच्याही पराभवाची प्रतीक्षा पाहावी लागेल आणि दोघांनाही अखेरची साखळी लढत जिंकावी लागेल. अशा परिस्थितीत दिल्ली, बंगळुरू, पंजाब व हैदराबाद यांचे समान १४ गुण होतील आणि उत्तम नेट रन रेट असलेला संघ पुढे जाईल.