IPL 2022: आयपीएलच्या सामन्यावेळी पोलिसांचा ऑनड्युटी धिंगाणा, बायोबबल क्षेत्रात जबरदस्ती केला शिरकाव, दोघांवर गुन्हा दाखल

IPL 2022: आयपीएलच्या सामन्यावेळी बंदोबस्त सोडून बायोबबल क्षेत्रात घुसून धिंगाणा घालणाऱ्या दोघा पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही पोलीस शिपाई असून एक नवी मुंबई आयुक्तालयातले तर दुसरे ठाणे आयुक्तालयातील कर्मचारी आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 03:41 PM2022-04-12T15:41:57+5:302022-04-12T15:42:19+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022: Police on duty during IPL match | IPL 2022: आयपीएलच्या सामन्यावेळी पोलिसांचा ऑनड्युटी धिंगाणा, बायोबबल क्षेत्रात जबरदस्ती केला शिरकाव, दोघांवर गुन्हा दाखल

IPL 2022: आयपीएलच्या सामन्यावेळी पोलिसांचा ऑनड्युटी धिंगाणा, बायोबबल क्षेत्रात जबरदस्ती केला शिरकाव, दोघांवर गुन्हा दाखल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - आयपीएलच्या सामन्यावेळी बंदोबस्त सोडून बायोबबल क्षेत्रात घुसून धिंगाणा घालणाऱ्या दोघा पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही पोलीस शिपाई असून एक नवी मुंबई आयुक्तालयातले तर दुसरे ठाणे आयुक्तालयातील कर्मचारी आहेत. रविवारी रात्री त्यांनी केलेला हा प्रकारकॅमेराच्या माध्यमातून बीसीसीआयच्या निदर्शनास आल्याने हा प्रकार उघडकीस आला.

रविवारी नेरुळ येथील डॉ. डि. वाय. पाटील स्टेडियमवर आयपीएलचे गुजरात टायटन्स विरुद्ध सनराइजर्स हैद्राबाद हे सामने खेळले जात होते. यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त नेमण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या प्रत्येक सामन्यावेळी स्टेडियममध्ये बायो बबल क्षेत्र तयार केले जात असून, त्यामध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही. यानंतर देखील रविवारी रात्री दोन पोलीस कर्मचारी त्याठिकाणच्या बंदोबस्तावरील महिला पोलीस अधिकाऱ्यांसोबत वाद घालून बायो बबल क्षेत्रात घुसले होते. घटनेवेळी दोन्ही पोलीस अधिकारी मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्यांना पकडून आवरते घेण्यासाठी इतर पोलीस त्यांच्या मागे धावत होते. हि बाब कॅमेराद्वारे बीसीसीआयच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे घडलेल्या कृत्याबद्दल त्यांनी गांभीर्य व्यक्त करताच दोघा पोलिसांवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र माटे (३३) व नरेंद्र नागपुरे (३६) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी माटे हे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे कर्मचारी असून नागपुरे हे ठाणे पोलीस आयुक्तालयातून बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले आहेत. या दोघांनाही स्टेडियम बाहेर बंदोबस्तावर नेमले असताना त्याठिकाणी त्यांनी ऑनड्युटी मद्यपान केले. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत त्यांनी स्टेडियम मध्ये प्रवेश करून बायोबबल क्षेत्रात शिरकाव केला. याप्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: IPL 2022: Police on duty during IPL match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.