IPL 2022 Prize Money, Final GT v RR: पुरस्कार विजेते खेळाडू होणार मालामाल! ऑरेंज कॅप, पर्पल कॅपसाठी किती बक्षिस जाणून घ्या

प्रत्येक विजेत्यावर पडणार लाखोंचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 07:17 PM2022-05-29T19:17:35+5:302022-05-29T19:31:23+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 Prize Money for purple cap orange cap winners to players crores of rupees IPL Finals | IPL 2022 Prize Money, Final GT v RR: पुरस्कार विजेते खेळाडू होणार मालामाल! ऑरेंज कॅप, पर्पल कॅपसाठी किती बक्षिस जाणून घ्या

IPL 2022 Prize Money, Final GT v RR: पुरस्कार विजेते खेळाडू होणार मालामाल! ऑरेंज कॅप, पर्पल कॅपसाठी किती बक्षिस जाणून घ्या

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Prize Money, Final GT v RR: सुमारे दोन महिन्यांपासून सुरू असलेला IPL 2022 चा हंगाम आज संपेल. रविवारी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स (GT Vs RR) यांच्यात अंतिम सामना होणार आहे. आजच्या सामन्यात जो संघ जिंकेल तो नवा इतिहास रचेल. संध्याकाळी ८ वाजता सुरू होणाऱ्या IPL Finals कडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. पण विशेष म्हणजे या फायनल नंतर केवळ विजेत्या संघावरच नव्हे तर खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडणार आहे. चॅम्पियन ठरणाऱ्या संघाला २० कोटी रुपये, तर उपविजेत्या संघाला १३ कोटी रुपयांचा इनाम देण्यात येणार आहे. पण महत्त्वाचे म्हणजे खेळाडूंनाही त्यांच्या वैयक्तिक कामगिरीसाठी खास इनाम दिले जाणार आहे. फायनलनंतर आज इतरही अनेक पुरस्कार मिळणार, जाणून घ्या कोणत्या पुरस्कारासाठी किती रक्कम मिळणार...

कोणाला किती कोटींचं बक्षीस-

विजेता संघ- 20 कोटी रुपये
उपविजेता- 13 कोटी रुपये
तिसऱ्या क्रमांकाचा संघ- 7 कोटी रुपये
चौथ्या क्रमांकाचा संघ- 6.50 कोटी
ऑरेंज कॅप- 15 लाख (सर्वाधिक धावा)
पर्पल कॅप - 15 लाख (सर्वाधिक बळी)
उदयोन्मुख खेळाडू- 20 लाख रुपये
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर (MVP)- 12 लाख
सर्वाधिक षटकार- 12 लाख रुपये
हंगामातील गेमचेंजर- 12 लाख रुपये
हंगामातील सुपर स्ट्रायकर-15 लाख

यंदाच्या IPL मध्ये एकूण 10 संघ खेळले. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ त्यांचा पहिला आयपीएल हंगाम खेळले. दोन्ही संघांनी चांगली कामगिरी करत प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. मात्र लखनौला पहिल्या क्वालिफायरमधूनच घरी जावं लागलं. आता आज गुजरात आणि राजस्थान विजेतेपदासाठी झुंजणार आहेत.

IPL 2022 मध्ये सर्वाधिक धावा-
जोस बटलर - ८२४ धावा*
लोकेश राहुल - ६१६ धावा
क्विंटन डी कॉक - ५०८ धावा

IPL 2022 मध्ये सर्वाधिक विकेट्स-
वानिंदू हसरंगा - 26 विकेट्स
युझवेंद्र चहल - 26 विकेट्स
कागिसो रबाडा - 26 विकेट्स

Web Title: IPL 2022 Prize Money for purple cap orange cap winners to players crores of rupees IPL Finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.