पंजाब किंग्स- पॉवर प्लेमध्ये तडाखेबंद फलंदाजी. लियॉम लिव्हिंगस्टोन मोठी फटकेबाजी करू शकतो. अनुभवी सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार मयांक अग्रवाल यांनी आतापर्यंत मोलाचे योगदान दिलेले नाही. मधल्या फळीत जितेश शर्माकडून तर डेथ ओव्हरमध्ये शाहरुख खान आणि ओडियन स्मिथकडून धावांची अपेक्षा.- गोलंदाजीत कॅगिसो रबाडा आणि लेगस्पिनर राहुल चाहर हे मॅचविनर असून, अर्शदीप सिंग, वैभव अरोरा, लिव्हिंगस्टोन उपयुक्त कामगिरी करू शकतात.
गुजरात टायटन्स- या संघाची कमकुवत बाजू त्यांची फलंदाजी आहे. शुभमन गिल आणि कर्णधार हार्दिक पांड्या यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज धावा काढू शकले नाहीत. विजय शंकर आणि मॅथ्यू वेड यांनी निराश केले तर राहुल तेवतिया आणि डेव्हिड मिलर कामगिरीत सातत्य राखू शकले नाहीत.- गोलंदाजीत मोहम्मद शमी, राशिद खान, लॉकी फर्ग्यूसन, अभिनव सदारंगानी, राहुल तेवतिया, जयंत यादव, अल्जारी जोसेफ यांच्याकडून प्रभावी कामगिरी अपेक्षित आहे.