IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : गुजरात टायटन्सने दुसऱ्याच षटकात विकेट मिळवून राजस्थान रॉयल्सला धक्का दिला खरा, परंतु संजू सॅमसनने ( Sanju Samson) सामना फिरवला. आक्रमक शैली ज्याची खासियात आहे, तो जोस बटलर ( Jos Buttler) आज संयमाने खेळताना दिसला. संजूचे अर्धशतक हुकले असले तरी त्याने त्याची भूमिका चोख बजावली. देवदत्त पडिक्कलनेही चांगली फटकेबाजी केली. GT च्या राशिद खानने ४ षटकांत केवळ १५ धावा देत उत्तम गोलंदाजी केली. खेळपट्टीवर स्थिरस्थावर झालेल्या बटलरने अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी करून राजस्थानला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. हार्दिक पांड्याकडून मिळालेलं जीवदानचा बटलरने चांगलाच फायदा उचलला...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठीच्या भारतीय संघात स्थान न मिळाल्याचा सर्व राग आज संजू सॅमसन ( Sanju Samson) काढला. राजस्थानचा यशस्वी जैस्वाल ( ३) दुसऱ्याच षटकात माघारी परतल्यानंतर सॅमसनने गुजरातच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. सॅमसनने उभ्या उभ्या सिक्स खेचून त्याचे खाते उघडले. पण, गुजरातच्या गोलंदाजांनी राजस्थानच्या धावगतीवर लगाम लावली होती. मोहम्मद शमीने टाकलेल्या पाचव्या षटकात सॅमसनचा झेल उडाला होता अन् मॅथ्यू वेडने तो टिपण्यासाठी सुरेख डाईव्हही मारली, परंतु त्याची उडी तोकडी पडली. सॅमसनचे खणखणीत षटकार पाहून
हार्दिक पांड्याही अवाक् झाला. राजस्थानने ६ षटकांत १ बाद ५५ धावा केल्या आणि त्यातील ३० धावा या संजूच्याच होत्या. त्याचे हे वादळ १०व्या षटकात गुजरातने परतवले. साई किशोरने ही विकेट घेतली. संजू २६ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४७ धावांवर माघारी परतला. त्याने
जोस बटलरसह ४७ चेंडूंत ६८ धावा जोडल्या.
जोस बटलर आज सावध पवित्र्यात होता. देवदत्त पडिक्कलनेही काही सुरेख फटके मारले, परंतु हार्दिक पांड्याने त्याची विकेट घेतली. पडिक्कल २० चेंडूंत २८ धावांवर त्रिफळाचीत झाला. बटलर एका बाजूने विकेट टिकवून खेळत होता. त्याने या सामन्यातून ट्वेंटी-२०त ८०००+ धावांचा टप्पाही ओलांडला. ४७व्या धावांवर असताना बटलरचा सोपा झेल घेण्याची संधी हार्दिकला होती, परंतु तो चेंडू टिपणात तोच त्याचा पाय घसरला अन् चेंडू त्याच्या डोक्यावरून चौकार गेला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर चौकार खेचून बटलरने अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४२ चेंडूंत आयपीएल २०२२मधील चौथे अर्धशतक पूर्ण केले.
त्यानंतर बटलरने चांगली फटकेबाजी केली. यश दयालने टाकलेल्या १७व्या षटकात १८, अल्झारी जोसेफने टाकलेल्या १८व्या षटकात १४ धावा बटलरने चोपल्या. १९व्या षटकात मोहम्मद शमीने RRला चौथा धक्का देताना शिमरोन हेटयारला ( ४) बाद केले. तरीही बटलरने त्या षटकात १३ धावा कुटल्या. बटलरने या पर्वात ७०० धावांचा टप्पा पार केला. बटलरने ५६ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारांसह ८९ धावा केल्या. अखेरच्या चेंडूवर तो रन आऊट झाला. राजस्थानने ६ बाद १८८ धावा केल्या.
Web Title: IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : Hardik Pandya slips down while taking Jos Buttler's catch, he scored 89 in 56 balls, Gujarat Titans need 189 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.