IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : मागील ७ सामन्यांत कुठेतरी हरवलेला जोस बटलर ( Jos Buttler) आज परतला... राजस्थान रॉयल्सच्या ( RR) या सलामीवीराने क्वालिफायर १ सामन्यात गुजरात टायटन्सच्या ( GT) गोलंदाजांचा पालापाचोळा केला. त्याने सुरुवातीला ३८ चेंडूंत ३९ धावाच केल्या होत्या, पण त्यानंतर त्याला हार्दिक पांड्या, राशिद खान यांच्याकडून जीवदान मिळाले आणि गडी पेटला... पुढील १८ चेंडूंत त्याने ५० धावा चोपून संघाला १८८ धावांचा डोंगर उभा करून दिला. (पाहा IPL 2022 - Qualifier 1 GT vs RR सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड)
यशस्वी जैस्वाल ( ३) लगेच माघारी परतल्यानंतर संजू सॅमसन व बटलर यांनी ४७ चेंडूंत ६८ धावा जोडल्या. संजूने २६ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४७ धावा कुटल्या. त्यानंतर आलेल्या देवदत्त पडिक्कलनेही २० चेंडूंत २८ धावांची खेळी केली. समोरील फलंदाज आक्रमक खेळ करत असतान बटलर मात्र शांत होता. १७व्या षटकात त्याने गिअर बदलला.. शांत असलेल्या वादळाने अचानक रुद्रावतार घेतला. त्याला रोखण्याची संधी हार्दिक व राशिदला मिळाली होती, परंतु त्यांनी ती गमावली.
बटलरने ३८ चेंडूंत ३९ धावा केल्या होत्या, परंतु त्यानंतर पुढील १८ चेंडूंत वादळ आले. 4,4,0,4,4,1,4,1,4, 4,0,1,4,6,6,0,2,1W अशा ५० धावांची खेळी त्याने पुढील १८ चेंडूंत केली. बटलर ५६ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारांसह ८९ धावांवर रन आऊट झाला. राजस्थानने ६ बाद १८८ धावांचा डोंगर उभा केला. आयपीएल २०२२ त ७०० धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला.
Web Title: IPL 2022 Qualifier 1 GT vs RR Live Updates : Jos Buttler 89 (56), in First 38 balls 39 runs and then 4,4,0,4,4,1,4,1,4 ,4,0,1,4,6,6, 0,2,1W by Buttler in last 18 balls - 50 runs, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.