IPL 2022 Qualifier 1 GT vs RR: गुजरात टायटन्स-राजस्थान रॉयल्स सामन्यावर पावसाचे सावट; मॅच न झाल्यास कोण जाईल फायनलमध्ये?; जाणून घ्या नियम 

IPL 2022 Qualifier 1 GT vs RR: कोलकाताच्या ईडन गार्डनवर आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा पहिला क्वालिफायर सामना होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 04:19 PM2022-05-24T16:19:18+5:302022-05-24T16:20:03+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 Qualifier 1 GT vs RR: Rajasthan Royals Give Crucial Rain And Weather Update Ahead Of Match against Gujarat Titans; If there is no match, who will go to the final?  | IPL 2022 Qualifier 1 GT vs RR: गुजरात टायटन्स-राजस्थान रॉयल्स सामन्यावर पावसाचे सावट; मॅच न झाल्यास कोण जाईल फायनलमध्ये?; जाणून घ्या नियम 

IPL 2022 Qualifier 1 GT vs RR: गुजरात टायटन्स-राजस्थान रॉयल्स सामन्यावर पावसाचे सावट; मॅच न झाल्यास कोण जाईल फायनलमध्ये?; जाणून घ्या नियम 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Qualifier 1 GT vs RR: कोलकाताच्या ईडन गार्डनवर आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा पहिला क्वालिफायर सामना होणार आहे. आयपीएलमध्ये पदार्पणातच गुजरात टायटन्सने दमदार कामगिरी करून सर्वाधिक २० गुणांसह क्वालिफायर १  मधील जागा पक्की केली. राजस्थान रॉयल्सनेही २००८नंतर प्रथमच टॉप टू मध्ये स्थान पटकावले आहे. त्यांनी १८ गुणांसह दुसरे स्थान पक्के केले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने कमाल करून दाखवली आहे आणि आज त्याला संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानला नमवून अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे. पण, गुजरात-राजस्थान यांच्या लढतीवर पावसाचे सावट आहे. 

आयपीएल २०२२मध्ये बीसीसीआयने फायनल सामन्यासाठीच राखीव दिवस ठेवला आहे, त्यामुळे प्ले ऑफच्या अन्य लढतींसाठी राखीव दिवस नाही. आज कोलकाता येथे पाऊस पडतोय आणि राजस्थान रॉयल्सने स्वतः एक व्हिडीओ पोस्ट करून याबाबत अपडेट्स दिले आहेत. त्यात तुरळक पाऊस पडतोय, परंतु वातावरण ढगाळलेले दिसत आहे. त्यामुळे आज सामना होणार की नाही, अशी चिंता फ‌ॅन्सला लागली आहेत. या सामन्याचे सर्व १ लाख तिकिटं विकली गेली आहेत. 

IPL 2022 playoffs Rules : ५-५ षटकांचा सामना, सुपर ओव्हरमध्ये निकाल, फायनल मध्यरात्री १.२० पर्यंत खेळवणार; जाणून घ्या IPL प्ले ऑफचे नियम

AccuWeather या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण, थोड्याच वेळात हे वातावरण मोकळे होणार असल्याचा अंदाजही व्यक्त केला गेला आहे. मात्र, सायंकाळी ८च्या सुमारास पुन्हा ढगाळ वातावरण असेल असेही म्हटले गेले आहे.


समजा पावसामुळे हा सामना न झाल्यास, निकाल सुपर ओव्हरमध्ये लावला जाईल. सुपर ओव्हर करणेही शक्य नसल्यास साखळी फेरीतील कामगिरीवर विजेता ठरवला जाईल आणि त्यानुसार गुजरात अंतिम फेरीत प्रवेश करेल. ''गरज असल्यास षटकांची मर्यादा कमी करून तो ५-५ षटकांचा सामना खेळवण्यात येईल. तेही शक्य नसल्यास सुपर ओव्हर च्या निकालातून विजेता ठरवला जाईल. सुपर ओव्हरही न झाल्यास साखळी फेरीतील कामगिरीवर निकाल लागेल,''असे बीसीसीआयच्या नियमात म्हटले आहे.  

प्ले ऑफच्या लढती दरम्यान पावसाने खोडा घातल्यास अतिरिक्त २०० मिनिटं राखीव ठेवण्यात आली आहेत. जर, अंतिम सामना सोडून अन्य तीन प्ले ऑफ लढती सुरू होण्यास विलंब होत असल्यास, ते सामने ९.४० पासून खेळवण्यात येतील. अंतिम सामन्यासाठी हीच वेळ १०.१० अशी ठरवण्यात आली आहे. सामना उशीरा सुरू झाल्यास दोन स्ट्रॅटेजिक टाईम आऊट असतील, परंतु इनिंग्जच्या मधल्या वेळेला कात्री लागेल.

 

Web Title: IPL 2022 Qualifier 1 GT vs RR: Rajasthan Royals Give Crucial Rain And Weather Update Ahead Of Match against Gujarat Titans; If there is no match, who will go to the final? 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.