Nathan Coulter Nile Replacement, IPL 2022: Rajasthan Royals चा ऑलराऊंडर कुल्टर-नाईल IPL मधून बाहेर; RR करतंय 'या' ३ पर्यायांचा विचार

राजस्थानच्या पहिल्याच सामन्यात कुल्टर-नाईल झाला होता दुखापतग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 06:37 PM2022-04-06T18:37:20+5:302022-04-06T18:38:41+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 Rajasthan Royals in deep trouble All Rounder Nathan Coulter Nile ruled out RR looking these 3 replacement options | Nathan Coulter Nile Replacement, IPL 2022: Rajasthan Royals चा ऑलराऊंडर कुल्टर-नाईल IPL मधून बाहेर; RR करतंय 'या' ३ पर्यायांचा विचार

Nathan Coulter Nile Replacement, IPL 2022: Rajasthan Royals चा ऑलराऊंडर कुल्टर-नाईल IPL मधून बाहेर; RR करतंय 'या' ३ पर्यायांचा विचार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Nathan Coulter Nile Replacement, Rajasthan Royals: IPL 2022 मध्ये चांगली कामगिरी करणारा राजस्थान रॉयल्सच्या संघाला मोठा धक्का बसला. त्यांचा अष्टपैलू खेळाडू नॅथन कुल्टर-नाईल दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. कुल्टर-नाईल केवळ एकच सामना खेळू शकला. त्यानंतर दुखापतीमुळे त्याला दोन सामने बाहेर बसावे लागले. आता दुखापतीवर उपचार घेण्यासाठी तो ऑस्ट्रेलियात परतणार असल्याचे बुधवारी जाहीर करण्यात आले. अशा परिस्थितीत नॅथन कुल्टर-नाईलच्या जागी राजस्थान रॉयल्सचा संघ कोणत्या खेळाडूसोबत नवा करार करणार असा प्रश्न विचारला जात आहे. सध्या राजस्थानचा संघ तीन पर्यायांचा विचार करत असल्याचं बोललं जात आहे.

नॅथन कुल्टर-नाईल वेगवान गोलंदाजीसह सातव्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करू शकत होता. त्याच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता होती. त्यामुळे त्याच्या जागी राजस्थान संघाला अशा खेळाडूचा आपल्या संघात समावेश करायला आवडेल. कुल्टर नाईलप्रमाणे राजस्थानला फायदा होऊ शकेल असे तीन खेळाडू सध्या चर्चेत आहेत. पाहूया ते तीन पर्याय.

श्रीलंकेचा एकदिवसीय आणि टी२० कर्णधार दसुन शनाका (Dasun Shanaka) राजस्थान रॉयल्ससाठी सर्वोत्तम बदली खेळाडू असू शकतो. गोलंदाजीसोबतच शनाका हा खालच्या फळीत फटकेबाजीही करू शकतो. अलीकडेच भारत दौऱ्यावर या खेळाडूने ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत १२४ धावा केल्या होत्या. यादरम्यान शनाकाचा स्ट्राईक रेट २००च्या आसपास होता.

डेव्हिड व्हिसा (David Wiese) हादखील राजस्थान रॉयल्ससाठी पर्याय असू शकतो. नामिबियाचा हा अष्टपैलू खेळाडू बऱ्याच दिवसांपासून चांगल्या लयीत आहे. टी२० विश्वचषकानंतर व्हिसाने पाकिस्तान सुपर लीगमध्येही चांगली कामगिरी केली. या फलंदाजाने लाहोर कलंदरसाठी १६८ धावा केल्या होत्या. यादरम्यान व्हिसाने चौकारांपेक्षा जास्त षटकार मारले होते. व्हिसाने या स्पर्धेत १२ षटकारांची आतषबाजी केली होती. तसाच तो सर्वोत्तम मॅच फिनिशरही मानला जातो.

राजस्थान रॉयल्ससाठी बेन कटिंग (Ben Cutting) हाही एक चांगला पर्याय ठरू शकतो. हा ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू अलीकडेच पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर झल्मीकडून खेळला. त्याने पीएसएलमध्ये खेळाडूने १३ षटकार आणि १३ चौकारांच्या मदतीने १९७ धावा केल्या होत्या. बेन कटिंगला IPLचाही अनुभव आहे. मुंबई इंडियन्सच्या संघातून त्याने आपली चमक दाखवली होती.

दरम्यान, राजस्थानचे संघ व्यवस्थापन कोणाला निवडणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Web Title: IPL 2022 Rajasthan Royals in deep trouble All Rounder Nathan Coulter Nile ruled out RR looking these 3 replacement options

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.