IPL 2022: आयपीएल सामन्यादरम्यान स्टेडिममध्ये रंगला कपलचा रोमान्स, स्टेडियमवरील किसिंग सीन व्हायरल 

IPL 2022 Update: - इंडियन प्रीमियर लीग आयपीएलच्या २०२२ मधील हंगामाला आता रंग चढत आहे. आयपीएलमध्ये मैदानावरील खेळाडूंच्या कामगिरीबरोबरच स्टेडियममधील उपस्थित प्रेक्षकांमधील काही लक्षवेधी चेहरेही प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 01:53 PM2022-04-03T13:53:59+5:302022-04-03T13:54:04+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022: Rangala couple romance in stadium during IPL match, kissing scene on stadium goes viral | IPL 2022: आयपीएल सामन्यादरम्यान स्टेडिममध्ये रंगला कपलचा रोमान्स, स्टेडियमवरील किसिंग सीन व्हायरल 

IPL 2022: आयपीएल सामन्यादरम्यान स्टेडिममध्ये रंगला कपलचा रोमान्स, स्टेडियमवरील किसिंग सीन व्हायरल 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - इंडियन प्रीमियर लीग आयपीएलच्या २०२२ मधील हंगामाला आता रंग चढत आहे. आयपीएलमध्ये मैदानावरील खेळाडूंच्या कामगिरीबरोबरच स्टेडियममधील उपस्थित प्रेक्षकांमधील काही लक्षवेधी चेहरेही प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहेत. दरम्यान, आयपीएलमध्ये काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सवर १४ धावांनी मात केली. या सामन्यात शुभमन गिल, मोहम्मद शमी, रशिद खान आणि लॉकी फर्ग्युसन यांनी जबरदस्त कामगिरी केली. मात्र या सामन्यातील खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा स्टेडियममध्ये एका कपलने केलेल्या कामगिरीचीच अधिक चर्चा होत आहे.

सामन्यादरम्यान, हे कपल किसिंग करत असताना कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले. तसेच ही घटना आयपीएल सामन्यादरम्यानची असल्याचा दावा करण्यात येत आहे.

आयपीएलमध्ये कॅमेरामन मैदानावर होत असलेला खेळ रेकॉर्ड करण्याबरोबरच आपल्या कॅमेऱ्याची नजर काही लक्षवेधी चेहऱ्यांवरून फिरवत असतात. त्यामध्ये जी कुणी आकर्षक महिला, व्यक्ती किंवा अन्य कुणी दिसते ते त्वरित व्हायरल होते. आतापर्यंत बहुतांश मिस्ट्री गर्ल्स व्हायरल झाल्या आहेत. मात्र आता हे किसिंग करतानाचं कपल कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हे फोटो व्हायरल झाले असून, त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या जात आहेत.

सोशल मीडियावर नेटिझन्स या कपलचे फोटो शेअर करत असून, त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. हे कपल आयपीएल सामन्यांना पुढच्या लेव्हलवर घेऊन गेले आहे. तर अन्य एका युझरने लिहिले की, माझा देश बदलत आहे. पुढे जात आहे, असे म्हटले आहे. तर एकाने लिहिले की, या कपलला आयपीएलमदील वेगवेगळ्या टीमनी सपोर्ट केला पाहिजे.

Read in English

Web Title: IPL 2022: Rangala couple romance in stadium during IPL match, kissing scene on stadium goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.