Who will RCB new captain after virat kohli? - कर्णधार म्हणून विराट कोहली ( Virat Kohli) याला इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL 2021) जेतेपद पटकावण्यात अपयश आलं. कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) आयपीएल २०२१मधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB)चे आव्हान एलिमिनेटर सामन्यात संपुष्टात आणले. त्यामुळे विराटची कर्णधार म्हणून आयपीएल जेतेपदाची पाटी कोरीच राहिली. यापुढे तो RCBकडून फक्त खेळाडू म्हणूनच खेळणार आहे.
IPL 2021चा दुसरा टप्पा सुरु होण्याआधीच विराटनं कर्णधार म्हणून ही अखेरची आयपीएल स्पर्धा असल्याचे स्पष्ट केले होते. काल RCBचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले अन् दुसरीकडे पंजाब किंग्सचा ( PBKS) तगडा फलंदाज पुढील पर्वात संघाची साथ सोडण्यास इच्छुक असल्याचे वृत्त आले. त्यामुळे विराटनंतर Punjab Kings चा हा फलंदाज RCBचे नेतृत्व सांभाळेल, असा अंदाज बांधला जात आहे.
RCB Next Captain : पंजाब किंग्सचा कर्णधार आणि IPL 2021त सर्वाधिक धावा करणारा लोकेश राहुल ( KL Rahul) हा पंजाब किंग्सची साथ सोडण्यास इच्छुक असल्याचे वृत्त समोर आले आहे. राहुलनं १३ सामन्यांत ६२६ धावा केल्या आहेत, परंतु तरीही पंजाब किंग्सची घोडदौड ही साखळी फेरीपर्यंतच संपुष्टात आली.
Cricbuzzनं दिलेल्या माहितीनुसार अनेक फ्रँचायझींनी राहुलशी संपर्क साधला आहे. पुढील पर्वात दोन नवे संघ सहभागी होणार असले तरी बीसीसीआयनं अद्याप रिटेशन पॉलिसी जाहीर केलेली नाही. त्यामुळे किती खेळाडूंना रिटेन केलं जाईल आणि Right To Match कार्डचा कसा वापर करता येईल, याबाबत संदिग्धता आहे.विराटच्या निर्णयानंतर RCBनं कर्णधार म्हणून त्यांचा मोर्चा लोकेश राहुलकडे वळवला आहे.
RCBचा कर्णधार म्हणून विराट कोहलीचा कामगिरीसामने - १४०
विजय - ६६
पराभव -७०
अनिर्णीत - ०४
धावा - ४८७१
सरासरी - ४१.९९
100/50 - ५/३५
Web Title: IPL 2022, RCB Next Captain : KL Rahul to part ways with Punjab Kings, possibly lead Virat Kohli at Royal Challengers Bangalore?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.