Join us  

Mystery Girl with Anushka Sharma IPL 2022 : ३०-३५ हजारांचं तिकीट घेऊन तिनं अनुष्का शर्मासोबत मॅच पाहिली; रातो रात ती सोशल मीडिया 'क्विन' झाली! 

Mystery Girl with Anushka Sharma IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यातील एका व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 6:19 PM

Open in App

Mystery Girl with Anushka Sharma IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यातील एका व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. एका मिस्ट्री गर्लने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) सोबत मॅच पाहतानाचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला. ३०-३५ हजारांचं कॉर्पोरेट बॉक्समधील तिकिट खरेदी करून ती तरुणी RCB vs DC सामना पाहायला गेली आणि तिने अनुष्कासोबतचा व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओला आतापर्यंत १ कोटीहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत. 

रवीना अहुजा ( Raveena Ahuja) असे या तरुणीचं नाव आहे. तिने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर लिहिले की, आयुष्यात पहिल्यांदा क्रिकेट स्टेडियमवर लाईव्ह मॅच पाहायला गेली आणि हा सर्वोत्तम अनुभव ठरला.  तिने पोस्ट केलेल्या व्हिडीओत अनुष्का  शर्माही दिसतेय. RCB ने तो सामना १६ धावांनी जिंकला.

 

टॅग्स :आयपीएल २०२२अनुष्का शर्मारॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिल्ली कॅपिटल्स
Open in App