IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live Updates : प्ले ऑफमध्ये आधीच स्थान पक्के केलेल्या गुजरात टायटन्सने ( GT) प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार हार्दिक पांड्याने आपल्या संघाला कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार रहावे, यासाठी हा निर्णय घेतला. पण, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB) दोन फलंदाजांना ३८ धावांत माघारी पाठवून GT ची कोंडी केली. चांगल्या फॉर्मात असलेला वृद्धीमान साहा ( ३१) हार्दिकच्या घाईमुळे रन आऊट झाला. पण, हार्दिक व डेव्हिड मिलरने GTच्या डावाला आकार दिला. मॅथ्यू वेड ( Matthew Wade ) आजच्या सामन्यात अपयशी ठरला, पण त्याला राग अनावर झाला. त्याने ड्रेसिंग रुममध्ये तोडफोड केली.
फॉर्मात असलेल्या वृद्धीमान साहाने चौकार-षटकार खेचून मनसुबे स्पष्ट केले. पण, तिसऱ्या षटकात जोश हेझलवूडने गुजरात टायटन्सला जमिनिवर आणले. हेझलवूडने टाकलेला अप्रतिम चेंडू शुबमन गिलच्या बॅटची किनार घेत दुसऱ्या स्लिपच्या दिशेने गेला. ग्लेन मॅक्सवेलने तितक्याच चपळाईने हनुमान उडी मारून एका हाताने चेंडू टिपला. त्याचा हा अफलातून कॅच पाहून विराट कोहलीही अवाक् झाला. त्यानंतर आलेला मॅथ्यू वेड ( १६) याला ग्लेन मॅक्सवेलने पायचीत केले. GT ची अवस्था २ बाद ३८ अशी झाली होती. पण, साहा चांगली फटकेबाजी करत होता. कर्णधार हार्दिक पांड्याने एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात साहाला रन आऊट केले. फॅफ ड्यू प्लेसिसच्या अचून थ्रो ने साहाला माघारी जाण्यास भाग पाडले. साहाने २२ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३१ धावा केल्या. पुढील षटकात हार्दिकला जीवदान मिळाले.
मॅथ्यू वेड का भडकला?ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर स्वीप मारण्याचा वेडचा प्रयत्न चुकला अन् चेंडू पॅडवर आदळला. RCB ने अपील करताच मैदानावरील अम्पायरने बाद दिले. पण, वेडने DRS घेतला. त्याच्या मते चेंडू व बॅट यांचा संपर्क झाला होता, परंतु अल्ट्रा एजमध्ये तसे काहीच दिसले नाही. यामुळे वेड प्रचंड संतापला. ड्रेसिंग रुममध्ये जाऊन त्याने पहिले हेल्मेट फेकले आणि नंतर बॅटने आदळ आपट केली... ( पाहा IPL 2022 - RCB vs GT सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )
पाहा व्हिडीओ..