IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live Updates : गुजरात टायटन्सने विजयासाठी ठेवलेले १६९ धावांचे लक्ष्य रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे ओपनर विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस सहज पार करतील असेच दिसतेय.. या दोघांनी गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई करताना १० षटकांत ८९ धावांची भागीदारी केली आहे. विराटने ३७ चेंडूंत आयपीएल २०२२मधील दुसरे आणि एकूण ४४ वे अर्धशतक झळकावले. पण, या सामन्यात विराट कोहली जमिनीवर कोसळला आणि त्यामुळे RCBच्या फॅन्सच्या काळजाचा ठोका चुकला. ( पाहा IPL 2022 - RCB vs GT सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )
प्ले ऑफमध्ये २० गुणांसह आधीच स्थान पक्के केलेल्या गुजरात टायटन्सने ( GT) प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आपल्या संघाला कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार रहावे, यासाठी कर्णधार हार्दिक पांड्याने हा निर्णय घेतला. पण, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB) त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. हार्दिक व डेव्हिड मिलर यांची अर्धशतकी भागीदारी आणि हार्दिक व राशिद यांनी १५ चेंडूंत ३५ धावांची भागीदारीच्या जोरावर गुजरातने कसेबसे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. शुबमन गिल ( १), मॅथ्यू वेड ( १६) धावांवर बाद झाले. साहा चांगली फटकेबाजी करत होता. कर्णधार हार्दिक पांड्याने एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात साहाला रन आऊट केले. साहाने २२ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३१ धावा केल्या.
हार्दिक व डेव्हिड मिलर ( David Miller) यांनी ४७ चेंडूंत ६१ धावांची भागीदारी केली. वनिंदू हसरंगाने १७व्या षटकात त्याच्याच गोलंदाजीवर मिलरला ( ३४ ) अफलातून रिटर्न कॅच घेतला. यासह हसरंगा आयपीएल २०२२मध्ये सर्वाधिक २५ विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. राहुल तेवातिया ( २) आज फेल गेला, हेझलवूडने त्यालाही माघारी पाठवले. हार्दिक व राशिद खान यांनी १५ चेंडूंत ३५ धावांची भागीदारी केली. हार्दिक ४७ चेंडूंत ६२ धावांवर नाबाद राहिला. त्याने ४ चौकार व ३ षटकार खेचले. राशिदने ६ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह नाबाद १९ धावा केल्या. गुजरातने ५ बाद १६८ धावा केल्या.
विराट कोहलीच्या बाजूने आज नशीब उभे राहिलेले दिसले. अगदी थोडक्यात त्याचा त्रिफळा उडताना वाचला, तर राशिद खानकडून झेलबाद होता होता वाचला. विराट व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी ५.१ षटकांत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. विराट आज थांबण्याचं नाव घेतच नव्हता. त्याची फटकेबाजी पाहून वानखेडे स्टेडियमवर विराट नावाचा गजर घुमला. सामन्याच्या ९व्या षटकात साई किशोरच्या गोलंदाजीवर फॅफने मारलेल्या फटक्यावर दोन धाव घेण्याच्या प्रयत्नात विराट व गोलंदाजाची टक्कर झाली. साई किशोरचा कोना विराटच्या डोक्यावर आदळला आणि काहीकाळासाठी विराट झोपूनच राहिला. पण, आपण तंदुरुस्त असल्याचा सिग्नल त्याने दिला आणि त्यानंतर अर्धशतक पूर्ण केले.
Web Title: IPL 2022 RCB vs GT Live Updates : collision between Virat Kohli and Sai Kishore, Kohli is flat on the ground but looks okay, he brings up a terrific fifty
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.