IPL 2022 RCB vs GT Live Updates : महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांचा जन्म १ मे १९६० रोजी झाला. त्यामुळे उद्या जसा महाराष्ट्र दिन ( Maharashtra Day) दणक्यात साजरा केला जाईल, तसा गुजरातमध्ये Gujarat Day साजरा होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये अहमदाबाद फ्रँचायझीच्या निमित्तानने पुन्हा एकदा गुजरातचा संघ खेळतोय. हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने ( Gujarat Titans) ८ विजयासह IPL 2022 Play Offs मध्ये जागा पक्की केली आहे. शनिवारी त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ( RCB) विजय मिळवून प्ले ऑफमध्ये जागा पक्की करणाऱ्या पहिल्या संघाचा मान मिळवला. १ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या गुजरात दिनाचं औचित्य साधून कर्णधार हार्दिकने हा विजय गुजरातमधील प्रत्येक व्यक्तिला समर्पित केला.
राहुल तेवातिया आणि डेव्हिड मिलर यांनी पुन्हा एकदा गुजरात टायटन्सला थरारक विजय मिळवून दिला. विराट कोहलीच्या फॉर्मात परतलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला GTच्या फलंदाजांनी धक्का दिला. RCB ने विजयासाठी ठेवलेल्या १७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातने १३ षटकांत ४ बाद ९५ धावा केल्या होत्या आणि त्यानंतर राहुल तेवातिया व डेव्हिड मिलर यांनी ४० चेंडूंत नाबाद ७९ धावा कुटून गुजरातला ६ विकेट्स व ३ चेंडू राखून विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी विराट कोहली ५३ चेंडूंत ५८ धावा करताना फॉर्मात परतला. आयपीएल २०२२मधील हे त्याचे पहिलेच अर्धशतक ठरले. त्याला रजत पाटिदारच्या ३२ चेंडूंत ५२ धावांची साथ मिळाली. ग्लेन मॅक्सवेलने १८ चेंडूंत ३३ आणि महिपाल लोम्रोरने ८ चेंडूंत १६ धावा केल्या. गुजरातकडून वृद्धीमान सहा (२९), शुबमन गिल ( ३१) व साई सुदर्शन ( २०) यांनी चांगली सुरूवात केली. हार्दिक पांड्या प्रथमच आयपीएल २०२२त एकेरी धावसंख्येवर बाद झाला. मिलरने २४ चेंडूंत नाबाद ३९, तर तेवातियाने २५ चेंडूंत नाबाद ४३ धावांची वादळी खेळी केली.
हार्दिक पांड्या काय म्हणाला?
गुजरात दिनाला उद्या ६२ वर्ष पूर्ण होत असल्याने गुजरात टायटन्स मुंबईत त्याचं जंगी सेलिब्रेशन करणार आहे. संघाचे सर्व खेळाडू गुजरातच्या पारंपरिक वेशात दिसतील. हार्दिक पांड्यानेही गुजरातच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला, रविवारी गुजरात दिन आहे आणि त्यानिमित्ताने आजचा हा विजय गुजरातच्या जनतेला समर्पित... तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल आभार. मी महाराष्ट्रात भरपूर क्रिकेट खेळलो आहे आणि मी महाराष्ट्र दिनाच्याही शुभेच्छा देतो.
Web Title: IPL 2022 RCB vs GT Live Updates : Hardik Pandya dedicates the victory against RCB to all people in Gujarat as it's Gujarat day, As I've played alot in Maharashtra, happy Maharashtra day as well
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.