Join us  

IPL 2022 RCB vs KKR : MS Dhoniच्या सानिध्यात राहून फॅफ ड्यू प्लेसिस काहीच नाही शिकला, चेंडू बॅटला लागूनही LBW साठी DRS घेतला, Video 

IPL 2022 RCB vs KKR : चेन्नई सुपर किंग्सचा स्टार फलंदाज फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf Du Plessis) आता ...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 4:51 PM

Open in App

IPL 2022 RCB vs KKR : चेन्नई सुपर किंग्सचा स्टार फलंदाज फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf Du Plessis) आता इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Banglore) चे नेतृत्व करतोय. त्याच्या नेतृत्वाखाली RCBने बुधवारी पहिल्या विजयाची चव चाखली. RCB ने डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर ( Kolkata Knight Riders) ३ विकेट्स व ४ चेंडू राखून विजय मिळवला. RCBला या लढतीत १२९ धावांचे लक्ष्य गाठताना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. दिनेश कार्तिकने ( Dinesh Karthik) पुन्हा एकदा मॅच फिनिशरची भूमिका बजावली. इतकी वर्ष MS Dhoni  सोबत खेळूनही फॅफने DRS घेण्यात एक मोठी चूक केली आणि सोशल मीडियावर स्वतःचं हसं करून घेतलं. 

वनिंदू हसरंगाने २० धावांत ४ विकेट्स घेतल्या. आकाश दीपने दोन, हर्षल पटेल दोन व  मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली.  डेव्हिड विलीनेही टिच्चून मारा केला आणि कोलकाताचा संघ १८.५ षटकांत १२८ धावांत तंबूत परतला. कोलकाताकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक २५ धावा केल्या, तर उमेश यादव व वरुण चक्रवर्थी यांची १०व्या विकेटसाठी २७ धावांची भागीदारी ही सर्वोत्तम ठरली.

कोलकाताच्या डावातील १६व्या षटकात हर्षलच्या गोलंदाजीवर वरुण चक्रवर्थीसाठी LBW चे जोरदार अपील झाले. हर्षलने भन्नाट यॉर्कर टाकला होता, परंतु मैदनावरील अम्पायरने नाबाद दिला आणि फॅफने DRS घेतला. पण, रिप्लेत चेंडू पॅडला नव्हे तर बॅटला लागल्याचे समोर आले आणि मीम्सचा पाऊस पडला.        

माफक धावांचा पाठलाग करताना बंगळुरूचे आघाडीचे तीनही फलंदाज १७ धावांवर माघारी परतले. डेव्हिड विली ( १८) , शेर्फाने रुथरफोर्ड ( २८), शाहबाद अहमद ( २७) यांनी बंगळुरूसाठी संघर्ष केला. उमेश यादव ( २) व टीम साऊदी ( ३) यांनी दिलेल्या धक्क्यातून RCB कसेबसे सावरले. सुनील नरीन याने उत्तम गोलंदाजी केली आणि बंगळुरूला अखेरच्या षटकापर्यंत झुंज द्यावी लागली. दिनेश कार्तिकने नाबाद १४  व हर्षल पटेलने नाबाद १० धावा करून बंगळुरूचा विजय साकारला. 

टॅग्स :आयपीएल २०२२एफ ड्यु प्लेसीसरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्स
Open in App