Josh Hazlewood IPL 2022, RCB vs LSG Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 'जोश' उंचावला; फॅफ ड्यू प्लेसिसच्या जोरावर विजय मिळवला

फॅफ ड्यू प्लेसिसच्या ९६ धावांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ४ बाद ६२ वरून मोठी मजल मारली. त्यानंतर जोश हेझलवूडने गोलंदाजीत कमाल केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 11:34 PM2022-04-19T23:34:25+5:302022-04-19T23:34:49+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022, RCB vs LSG Live Updates : Faf du Plessis 96 runs and  Josh Hazlewood 4 wickets; Royal Challengers beat Lucknow Super Giants by 18 runs  | Josh Hazlewood IPL 2022, RCB vs LSG Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 'जोश' उंचावला; फॅफ ड्यू प्लेसिसच्या जोरावर विजय मिळवला

Josh Hazlewood IPL 2022, RCB vs LSG Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 'जोश' उंचावला; फॅफ ड्यू प्लेसिसच्या जोरावर विजय मिळवला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाने मंगळवारी लखनौ सुपर जायंट्स ( LSG) संघावर विजय मिळवला. निराशाजनक सुरुवातीनंतर कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसच्या ( Faf du Plessis) दमदार ९६ धावांच्या जोरावर RCBने तगडे आव्हान उभे केले. त्यानंतर जोश हेझलवूडने ( Josh Hazlewood) अनुभव पणाला लावून LSGला झटके दिले. हेझलवूडने २५ धावांत ४ विकेट्स घेतल्या. 

फॅफ ड्यू प्लेसिसच्या ९६ धावांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ४ बाद ६२ वरून मोठी मजल मारली. दुष्मंथा चमिराने पहिल्याच षटकात अनुज रावत ( ४) व विराट कोहली  (०) यांना बाद केले. ग्लेन मॅक्सवेलने ( २३) दमदार फटकेबाजी केली. पण, जेसन होल्डरच्या अफलातून कॅचने हे वादळ रोखले. त्यापाठोपाठ होल्डरने गोलंदाजीत कमाल करताना सुयश प्रभुदेसाईची विकेट घेऊन RCBची अवस्था ४ बाद ६२ अशी केली. शाहबाज अहमद व  ड्यू प्लेसिस यांनी ४८ चेंडूंत ७० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. शाहबाज २६ धावांवर रन आऊट झाला.  फॅफने ६४ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ९६ धावा केल्या. वर माघारी जावे लागले. जेसन होल्डरने अखेरच्या षटकात चार धावा देत फॅफची विकेट घेतली. RCBला ६ बाद १८१ धावा करता आल्या. 


दुसऱ्या डावात फॅफ मैदानावर न आल्याने विराट कोहली नेतृत्व करताना दिसला. लखनौला १७ धावांवर जोश हेझलवूडने पहिला धक्का दिला. क्विंटन डी कॉक लगेच माघारी परतला. काही षटकं विराटने नेतृत्व केल्यानंतर फॅफ पुन्हा मैदानावर परतला आणि कर्णधारपदाची सूत्रं हाती घेतली. पण, काही काळ का असेना विराटला पुन्हा नेतृत्व करताना पाहून चाहते सुखावले होते. हेझलवूडने पुढील षटकात LSGच्या मनीष पांडेची ( ६) विकेट घेत RCBला मोठे यश मिळवून दिले. लखनौनेही अनपेक्षित चाल खेळताना कृणाल पांड्याला फलंदाजीला पाठवले. डाव्या-उजव्या जोडीने RCBची डोकेदुखी वाढवण्याचा त्यांचा डाव होता. दरम्यान, लोकेश राहुलने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ६००० धावांचा पल्ला ओलांडला.


डावाच्या ८व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर हर्षल पटेलने लखनौला मोठा धक्का दिला आणि लोकेशला ३० धावांवर माघारी परतावे लागले. कृणाल पांड्यासह त्याने १८ चेंडूंत ३१ धावा जोडल्या. कृणाल व दीपक हुडा यांची ३६ धावांची भागीदारी मोहम्मद सिराजने संपुष्टात आणली. हुडा १३ धावांवर बाद झाला. त्यापुढील षटकात ग्लेन मॅक्सवेलने २८ चेंडूंत ४२ धावा करणाऱ्या कृणालची विकेट काढली. लखनौला ३० चेंडूंत ६५ धावांची गरज होती आणि  मार्कस स्टॉयनिस व आयुष बदोनी ही जोडी यांच्याकडून आशा होती. वनिंदू हसरंगाने टाकलेल्या १६व्या षटकात LSGने ११ धावा घेतल्या. पण, हेझलवूडने १७व्या षटकात बदोनीला बाद करून RCBला विजयाच्या नजीक पोहोचवले. हेझलवूडच्या त्या षटकात १० धावा आल्या आणि १ विकेट पडली. हेझलवूडने १९व्या षटकात स्टॉयनिसचा ( २४) त्रिफळा उडवला. लखनौला ८ बाद १६३ धावांवर समाधान मानावे लागले. RCBने १८ धावांनी हा सामना जिंकला. 

Web Title: IPL 2022, RCB vs LSG Live Updates : Faf du Plessis 96 runs and  Josh Hazlewood 4 wickets; Royal Challengers beat Lucknow Super Giants by 18 runs 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.