IPL 2022, Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिसची शानदार फलंदाजी आणि जोश हेझलवूडच्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाने IPL 2022 मधील पाचवा विजय मिळवला. मंगळवारी लखनौ सुपर जायंट्स ( LSG) संघावर त्यांनी १८ धावांनी विजय मिळवला. १९व्या षटकात जोश हेझलवूडने मार्कस स्टॉयनिसची ( Marcus Stoinis) विकेट घेतली. त्याआधी अम्पायरच्या एका निर्णयावर स्टॉयनिस प्रचंड चिडला आणि मैदानाबाहेर जाताना शिव्या देत आपला राग काढला.
फॅफ ड्यू प्लेसिसच्या ९६ धावांच्या जोरावर बंगळुरूने ६ बाद १८१ धावांपर्यंत मजल मारली. दुष्मंथा चमिराने पहिल्याच षटकात अनुज रावत ( ४) व विराट कोहली (०) यांना बाद केले. ग्लेन मॅक्सवेलने ( २३) दमदार फटकेबाजी केली. शाहबाज अहमद व ड्यू प्लेसिस यांनी ४८ चेंडूंत ७० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. शाहबाज २६ धावांवर रन आऊट झाला. फॅफने ६४ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ९६ धावा केल्या. जेसन होल्डरने अखेरच्या षटकात चार धावा देत फॅफची विकेट घेतली.
प्रत्युत्तरात लखनौला जोश हेझलवूडने धक्के दिले. क्विंटन डी कॉक ( ३) व मनीष पांडे ( ६) यांना त्याने बाद केले. ८व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर हर्षल पटेलने लखनौला मोठा धक्का दिला आणि लोकेशला ३० धावांवर माघारी परतावे लागले. कृणाल पांड्यासह त्याने १८ चेंडूंत ३१ धावा जोडल्या. कृणाल व दीपक हुडा यांची ३६ धावांची भागीदारी मोहम्मद सिराजने संपुष्टात आणली. हुडा १३ धावांवर बाद झाला. त्यापुढील षटकात ग्लेन मॅक्सवेलने २८ चेंडूंत ४२ धावा करणाऱ्या कृणालची विकेट काढली.
हेझलवूडने १९व्या षटकात स्टॉयनिसचा ( २४) त्रिफळा उडवला. त्याआधीच्या चेंडूवर अम्पायरने Wide न दिल्याने स्टॉयनिस चिडला होता. बाद झाल्यानंतर त्याला राग अनावर झाला आणि त्याने शिव्या दिल्या.