IPL 2022, Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिसच्या ९६ धावांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ४ बाद ६२ वरून मोठी मजल मारली. लखनौ सुपर जायंट्ससमोर त्यांनी विजयासाठी १८२ धावांचे लक्ष्य ठेवले. RCBच्या धावांचा पाठलाग करताना मैदानावर उतरलेल्या LSGने सावध सुरूवात केली. पण, RCBचा हा दुसरा डाव चाहत्यांना सुखावणारा होता. विराट कोहली ( Virat Kohli) संघाचे नेतृत्व करताना दिसला आणि विराटला पुन्हा कर्णधार म्हणून पाहून चाहत्यांनी नवी मुंबईचे डी वाय पाटील स्टेडियम दणाणून सोडले.
दुष्मंथा चमिराने पहिल्याच षटकात अनुज रावत ( ४) व विराट कोहली (०) यांना बाद केले. ग्लेन मॅक्सवेलने तिसऱ्या षटकात चमिराची धुलाई केली. फॅफ ड्यू प्लेसिसने हॅटट्रिक चेंडूवर चौकार खेचला अन् एक धाव करून मॅक्सवेलला स्ट्राईक दिली. त्यानंतर मॅक्सवेलने ४,४,६ अशी फटकेबाजी केली. पण, जेसन होल्डरच्या ( Jason Holder) अफलातून कॅचने हे वादळ रोखले. त्यापाठोपाठ होल्डरने गोलंदाजीत कमाल करताना सुयश प्रभुदेसाईची विकेट घेऊन RCBची अवस्था ४ बाद ६२ अशी केली. शाहबाज अहमद व ड्यू प्लेसिस यांनी ४८ चेंडूंत ७० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. शाहबाज २६ धावांवर रन आऊट झाला. फॅफने ६४ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ९६ धावा केल्या. वर माघारी जावे लागले. जेसन होल्डरने अखेरच्या षटकात चार धावा देत फॅफची विकेट घेतली. RCBला ६ बाद १८१ धावा करता आल्या.
दुसऱ्या डावात फॅफ मैदानावर न आल्याने विराट कोहली नेतृत्व करताना दिसला. लखनौला १७ धावांवर जोश हेझलवूडने पहिला धक्का दिला. क्विंटन डी कॉक लगेच माघारी परतला. काही षटकं विराटने नेतृत्व केल्यानंतर फॅफ पुन्हा मैदानावर परतला आणि कर्णधारपदाची सूत्रं हाती घेतली. पण, काही काळ का असेना विराटला पुन्हा नेतृत्व करताना पाहून चाहते सुखावले होते.
Web Title: IPL 2022, RCB vs LSG Live Updates : Virat Kohli is captaining RCB now as a stand-in captain! Faf du plessis is yet to take the field
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.