IPL 2022, Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आजचा दिवस काही खास जातोय असे वाटत नाही. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या लढतीत पहिल्याच षटकात RCBचे दोन फलंदाज माघारी परतले. ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) RCBचा तारणहार ठरेल असे वाटत होते, परंतु जेसन होल्डरने ( Jason Holder) अफलातून झेल घेत LSGला मोठे यश मिळवून दिले. कृणाल पांड्याने टाकलेला चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात मॅक्सवेल झेलबाद झाला. होल्डरने हवेत झेप घेत हा झेल टिपला.
लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुष्मंथा चमिराने पहिल्याच षटकात RCBला दोन दणके दिले. अनुज रावतने चौथ्या चेंडूवर चौकार खेचून चमिराला ठसन दिली, परंतु पुढच्याच चेंडूवर त्याची विकेट पडली. लोकेश राहुलने मिड ऑफला सुरेख झेल टिपला. त्यानंतर मैदानावर विराट कोहलीने ( Virat Kohli) चमिराने टाकलेल्या शॉर्ट लेंथ चेंडूवर हलका फटका मारला, पंरतु दीपक हुडाने सहज झेल टिपला. २०१७नंतर आयपीएलमध्ये कोहली प्रथमच ( Golden Duck) शून्यावर बाद झाला. २००८ मध्ये आशिष नेहरा ( MI), २०१४मध्ये संदीप शर्मा ( PBKS) आणि २०१७मध्ये नॅथन कोल्टर नायल ( KKR) यांनी त्याला गोल्डन डकवर बाद केले होते.
मॅक्सवेलने तिसऱ्या षटकात चमिराची धुलाई केली. फॅफ ड्यू प्लेसिसने हॅटट्रिक चेंडूवर चौकार खेचला अन् एक धाव करून मॅक्सवेलला स्ट्राईक दिली. त्यानंतर मॅक्सवेलने ४,४,६ अशी फटकेबाजी केली. पण, जेसन होल्डरच्या ( Jason Holder) अफलातून कॅचने हे वादळ रोखले. त्यानंतर होल्डरने गोलंदाजीत कमाल करताना RCBच्या सुयश प्रभुदेसाईला झेलबाद केले.
पाहा व्हिडीओ
Web Title: IPL 2022, RCB vs LSG Live Updates : What a catch by Jason Holder, Krunal Pandya gets the big fish of RCB and end a good knock by Glenn Maxwell, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.