IPL 2022, Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants Live Updates : लखनौ सुपर जायंट्सला साजेशी सुरूवात करता आली नाही. १८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौचे ३ फलंदाज ६४ धावांवर माघारी परतले. कर्णधार लोकेश राहुलची विकेट ही सर्वांना आश्चर्याचकीत करणारी ठरली.
फॅफ ड्यू प्लेसिसच्या ९६ धावांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ४ बाद ६२ वरून मोठी मजल मारली. लखनौ सुपर जायंट्ससमोर त्यांनी विजयासाठी १८२ धावांचे लक्ष्य ठेवले. दुष्मंथा चमिराने पहिल्याच षटकात अनुज रावत ( ४) व विराट कोहली (०) यांना बाद केले. ग्लेन मॅक्सवेलने ( २३) दमदार फटकेबाजी केली. पण, जेसन होल्डरच्या ( Jason Holder) अफलातून कॅचने हे वादळ रोखले. त्यापाठोपाठ होल्डरने गोलंदाजीत कमाल करताना सुयश प्रभुदेसाईची विकेट घेऊन RCBची अवस्था ४ बाद ६२ अशी केली. शाहबाज अहमद व ड्यू प्लेसिस यांनी ४८ चेंडूंत ७० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. शाहबाज २६ धावांवर रन आऊट झाला. फॅफने ६४ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ९६ धावा केल्या. वर माघारी जावे लागले. जेसन होल्डरने अखेरच्या षटकात चार धावा देत फॅफची विकेट घेतली. RCBला ६ बाद १८१ धावा करता आल्या.
डावाच्या ८व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर हर्षल पटेलने लखनौला मोठा धक्का दिला. हर्षल पटेलने डाव्या बाजूला चेंडू टाकला आणि तो यष्टिरक्षक दिनेश कार्तिकच्या हाती सहज विसावला. पण, कार्तिककडून काही अपील झाले नाही आणि अम्पायरनेही Wide सिग्नल दिला नाही. त्यानंतर RCBने DRS घेतला अन् त्यात चेंडू बॅटची हलकी किनार घेतल्याचे अल्ट्रा एजमध्ये समोर आले आणि लोकेशला ३० धावांवर माघारी परतावे लागले.