IPL 2022 T20 Match RCB vs PBKS Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिनने ( Faf du Plessis) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात धुरळा उडवला. युवा फलंदाज अनुज रावतला सोबत घेऊन सुरूवातीला त्याने RCBचा मजबूत पाया रचला. त्यानंतर विराट कोहली ( Virat Kohli) सोबत मिळून पंजाब किंग्सच्या ( PBKS) गोलंदाजांना अक्षरशः चोपून काढले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६१ चेंडूंत ११८ धावांची भागीदारी करून RCB ला मोठी धावसंख्या उभारून दिली. दिनेश कार्तिकने अखेरच्या षटकांत हात धुवून घेतले.
इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात नव्या कर्णधारासह दोन संघ आता डी वाय पाटील स्टेडियमवर उतरले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स ( Royal Challengers Bangalore Vs Punjab Kings) असा हा सामना रंगत आहे. विराट कोहली ( Virat Kohli) ९ वर्षांत प्रथमच RCBचा खेळाडू म्हणून मैदानावर उतरणार आहे. यंदा फॅफ ड्यू प्लेसिसकडे RCBकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. पंजाब किंग्सही ( PBKS) मयांक अग्रवालच्या नेतृत्वाखाली नव्याने सुरुवात करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. PBKS ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
फॅफ ड्यू प्लेसिस व अनुज रावत यांनी RCBला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. अनुज २१ धावांवर राहुल चहरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर विराट कोहली ( Virat Kohli) मैदानावर येताच एकच जल्लोष झाला. विराट व ड्यू प्लेसिस या जोडीने पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली. विराटने आजच्या सामन्यात मैदानावर उतरताच विक्रम केला. आयपीएलमध्ये २०० डाव खेळणारा तो तिसरा भारतीय ठरला. रोहित शर्मा ( २०९ डाव) या विक्रमात आघाडीवर आहे. विराट व सुरेश रैना यांनी २०० डाव खेळले आहेत. फॅफ व विराट यांनी हरप्रीत ब्रारने टाकलेल्या १४व्या षटकात २१ धावा कुटल्या. फॅफने दोन, तर विराटने एक षटकार खेचला.
RCBचा कर्णधार म्हणून पदार्पणातच फॅफने अर्धशतक झळकावले आणि आयपीएलमध्ये ३०००+ धावांचा पल्ला ओलांडला. ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, डवे्हिड वॉर्नर, शेन वॉटसन, किरॉन पोलार्ड यांच्यानंतर असा पराक्रम करणारा फॅफ हा सहावा परदेशी फलंदाज ठरला. फॅफ व विराट यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली. ७ धावांवर जीवदान मिळालेला फॅफ ५७ चेंडूंत ३ चौकार व ७ षटकारांच्यासह ८८ धावांवर माघारी परतला. दिनेश कार्तिकने दमदार खेळ करताना विराटसह RCB ला २ बाद २०५ धावांचा डोंगर उभा करून दिला. या मैदानावरील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. यापूर्वी २०११मध्ये दिल्लीने ७ बाद १९० धावा केल्या होत्या. ( This is now the largest total at this venue in the IPL beating 190/7 posted by Delhi in 2011) कार्तिकने १४ चेंडूंत ३२ धावा, तर विराटने २९ चेंडूंत ४१ धावा चोपल्या.
Web Title: IPL 2022 RCB vs PBKS Live Score card Updates : Half-century for captain Faf du Plessis on his RCB debut, RCB in their opening game of IPL 2022 - 205/2
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.