Virat Kohli, IPL 2022 RCB vs PBKS Live : २०५ धावा करूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हरले; पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी त्यांना धु धु धुतले... 

IPL 2022 T20 Match RCB vs PBKS Live Updates : पंजाब किंग्स ( Punjab Kings) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यातल्या लढतीत डाव्या-उजव्यांचा खेळ पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 11:21 PM2022-03-27T23:21:33+5:302022-03-27T23:21:50+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 RCB vs PBKS Live Score card Updates : Odean Smith takes 25 from the 18th over to almost secure victory for Punjab, PBKS beat RCB by 5 wickets  | Virat Kohli, IPL 2022 RCB vs PBKS Live : २०५ धावा करूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हरले; पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी त्यांना धु धु धुतले... 

Virat Kohli, IPL 2022 RCB vs PBKS Live : २०५ धावा करूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हरले; पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी त्यांना धु धु धुतले... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 T20 Match RCB vs PBKS Live Updates : पंजाब किंग्स ( Punjab Kings) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यातल्या लढतीत डाव्या-उजव्यांचा खेळ पाहायला मिळाला. RCBच्या फॅफ ड्यू प्लेसिस, विराट कोहली, दिनेश कार्तिक यांच्या फटेकबाजीला PBKS च्या शिखर धवन व भानुका राजपक्षा या डावखुऱ्या फलंदाजांनी टक्कर दिली. ओडिन स्मिथला ( Odean Smith) जीवदान दिल्याचा फटका RCBला बसला. त्याने १८व्या षटकात २५ धावा चोपून सामना PBKSच्या पारड्यात आणून ठेवला. त्यापुढे शाहरूख खानने औपचारिकता पार पाडली आणि पंजाबने बाजी मारली. 

फॅफ ड्यू प्लेसिनने ( Faf du Plessis) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात दमदार खेळ केला.  अनुज रावत, विराट कोहली व दिनेश कार्तिक यांनीही दमदार खेळी करताना पंजाब किंग्ससमोर २०६ धावांचे लक्ष्य ठेवले. युवा फलंदाज अनुज रावतला सोबत घेऊन सुरूवातीला फॅफने ५० धावा जोडून मजबूत पाया रचला. त्यानंतर विराट कोहली ( Virat Kohli) सोबत मिळून पंजाब किंग्सच्या ( PBKS) गोलंदाजांना अक्षरशः चोपून काढले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६१ चेंडूंत ११८ धावांची भागीदारी करून RCB ला मोठी धावसंख्या उभारून दिली.  ७ धावांवर जीवदान मिळालेला फॅफ ५७ चेंडूंत ३ चौकार व ७ षटकारांच्यासह ८८ धावांवर माघारी परतला. 

दिनेश कार्तिकने विराटसह १७ चेंडूंत नाबाद ३७ धावांची भागीदारी केली.  कार्तिकने १४ चेंडूंत ३२ धावा, तर विराटने २९ चेंडूंत ४१ धावा चोपल्या. अनुज २१ धावांवर राहुल चहरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.  दिनेश कार्तिकने दमदार खेळ करताना विराटसह RCB ला २ बाद २०५ धावांचा डोंगर उभा करून दिला. प्रत्युत्तरात पंजाब किंग्सकडूनही जबरदस्त पलटवार झाला. शिखर धवन व मयांक अग्रवाल या जोडीने पहिल्या विकेटसाठी १० च्या सरासरीने ७१ धावांची भागीदारी केली. वनिंदू हसरंगाने त्याच्या पहिल्याच षटकात ही जोडी तोडली. मयांक २४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३२ धावांवर बाद झाला.


शिखर धवन सुसाट सुटलेला. त्याने ही २९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारांसह ४३ धावांची खेळी केली. हर्षल पटेलने त्याला बाद केले. पदार्पणवीर भानुका राजपक्षा RCBच्या गोलंदाजांना कुटत होता. २२ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४३ धावांची त्याची खेळी मोहम्मद सिराजने संपुष्टात आणली. पुढच्याच चेंडूवर सिराजने ( ०) राज बावाला पायचीत करून पंजाबला धक्के दिले. १४ षटकांत पंजाबने ४ बाद १४५ धावा केल्या होत्या आणि त्यांना विजयासाठी ३६ चेंडूंत ६१ धावा करायच्या होत्या. इथे सामन्याला खऱ्या अर्थाने चुरस निर्माण झाली होती. आकाश दिपने १५व्या षटकात लाएम लिव्हिंगस्टोनला ( १९) वाद करून पंजाबला मोठा धक्का दिला. 


लिव्हिंगस्टोनच्या विकेटनंतर पंजाबवर दडपण निर्माण झालेले दिसले. शाहरुख खान अधूनमधून फटके मारून हे दडपण कमी करण्याचा प्रयत्न करताना दिसला. १७व्या षटकात अनुज रावतने PBKSच्या ओडीन स्मिथचा सोपा झेल सोडला. त्याच षटकात हर्षल पटेलने स्मिथला रन आऊट करण्याची सोपी संधी गमावली. १८ चेंडूंत ३६ धावा हव्या असताना जीवदान दिलेल्या स्मिथने १८व्या षटकात सिराजच्या पहिल्या तीन चेंडूंवर दोन षटकार व एक चौकार खेचून सामन्याचे चित्र बदलले. स्मिथने ८ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह नाबाद २५ धावा केल्या. शाहरुखने नाबाद २४ धावा करून ५ विकेट्स व ६ चेंडू राखून पंजाबला विजय मिळवून दिला.

Web Title: IPL 2022 RCB vs PBKS Live Score card Updates : Odean Smith takes 25 from the 18th over to almost secure victory for Punjab, PBKS beat RCB by 5 wickets 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.