IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live Updates : अपयश काही केल्या विराट कोहलीची ( Virat Kohli) पाठ सोडताना दिसत नाही. आज विराटचे फटके पाहून पंजाब किंग्सने उभे केलेले २०९ धावांचे आव्हान रॉयल चॅलेंजर्स पार करतील असे वाटले होते. पण, नशिबाने घात केलाच.. कागिसो रबाडा ( Kagiso Rabada) गोलंदाजीला आला अन् विराटची विकेट मिळवून गेला. आपण नाबाद आहे, असे विराटला वाटले अन् त्याने DRS घेतला. पण, चेंडू हलकासा ग्लोव्ह्जला घासून थाय पडला लागून पंजाबच्या राहुल चहरच्या हाती विसावला. बाद असल्याचे पाहून विराट चिडला अन् त्याने आकाशाकडे पाहून जणू देवाला जाब विचारला. विराटला १३ सामन्यांत १९.६७च्या सरासरीने २३६ धावा करता आल्या.
पंजाब किंग्सच्या २०९ धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांना विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिसकडून फार अपेक्षा होती. पण, कागिसो रबाडा व रिषी धवन यांनी RCBच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवून मोठा धक्का दिला. या सामन्याआधी विराट कोहलीच्या नावावर २१९ सामन्यांत ३६.३१च्या सरासरीने ६४९९ धावा केल्या होत्या आणि पहिली धाव घेताच आयपीएलमध्ये ६५०० धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. तसेच ट्वेंटी-२०त १०५०० धावा करणारा पहिला भारतीय फलंदाजही तोच ठरला. कागिसो रबाडाने चौथ्या षटकात RCBला मोठा धक्का दिला. सुरेख फटका मारणाऱ्या विराटला त्याने बाद केले. २० धावांवर माघारी परतताना विराटही देवाकडे जाब विचारताना दिसला. पुढील षटकात रिषी धवनने फॅफला ( १०) व महिपाल लोमरोर ( ६) यांना बाद करून PBKSला मोठे यश मिळवून दिले.
Web Title: IPL 2022 RCB vs PBKS Live Updates : Virat Kohli dismissed for 20 in 14 balls. Kagiso Rabada gets him for the 4th time, see virat and preity zinta reaction Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.