Golden Duck Virat Kohli IPL 2022, RCB vs SRH : इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये विराट कोहलीने ( Virat Kohli) शून्यावर बाद होण्याचा विक्रमच केला. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या आजच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( RCB) सलामीवीर पुन्हा एकदा गोल्डन डकवर बाद झाला. जगदीशा सुचिथने फिरकीच्या जाळ्यात त्याला अडकवले अन् शॉर्ट मिडविकेटवर उभ्या असलेल्या केन विलियम्सनने त्याचा सोपा झेल घेतला. आयपीएल २०२२मध्ये SRHविरुद्ध विराट दोन्ही डावांत गोल्डन डकवर बाद झाला. यंदाच्या पर्वात तो तिसऱ्यांदा गोल्डन डकवर बाद झाला आहे आणि RCBचा कोणताच फलंदाज यापूर्वी एकाच पर्वात ३ वेळा Golden Duck बाद झाला नव्हता.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ११ सामन्यांत १२ गुणांसह चौथ्या क्रमांकावर असलेल्या RCB ला प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी आता तीनही लढती जिंकाव्या लागणार आहेत. अशात फॅफचा हा निर्णय सर्वांना धक्का देणारा ठरला. SRHची मागील काही सामन्यांतील कामगिरी समाधानकारक झाली नसली तरी हा संघ कधीही मुसंडी मारू शकतो आणि RCBच्या प्ले ऑफ शर्यतीतील हा सर्वात मोठा अडथळा आहे.
फॅफचा निर्णय फसला अन् विराट पहिल्याच चेंडूवर बाद झाला. केनने पहिले षटका फिरकीपटू जगदीशा सुचिथकडून टाकून घेतले. जगदीशाने चेंडू विराटच्या पॅडच्या दिशेने टाकला अन् विराटला फटका मारण्यास भाग पाडले. शॉर्ट मिड विकेटवर केन तयारच होता.. सर्व काही ठरल्याप्रमाणे घडले अन् विराट गोल्डन डकवर बाद झाला. २००८ ते २०२१ या आयपीएलमध्ये विराट फक्त तीन वेळाच गोल्डन डकवर बाद झाला होता आणि २०२२मध्ये तो तीन वेळा पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. विराटने यंदाच्या पर्वात १२ सामन्यांत १९.६४च्या सरासरीने २१६ धावा केल्या आहेत.
Web Title: IPL 2022, RCB vs SRH : Golden duck for Virat Kohli : Virat Kohli is the first RCB player to register 3 golden ducks in an IPL season, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.