Kaviya Maran Dancing IPL 2022 RCB vs SRH Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ ६८ धावांत माघारी; SRHची मालकिण काव्या मारन नाचली लय भारी, Video 

IPL 2022 ROYAL CHALLENGERS BANGALORE vs SUNRISERS HYDERABAD Live Updates :  इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या आजच्या सामन्यात RCB ची बेक्कार अवस्था झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 09:04 PM2022-04-23T21:04:49+5:302022-04-23T21:05:24+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 RCB vs SRH Live Updates : Royal Challengers Banglore are all out on 68; Sunrisers Hyderabad owner Kaviya Maran Dancing video goes viral  | Kaviya Maran Dancing IPL 2022 RCB vs SRH Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ ६८ धावांत माघारी; SRHची मालकिण काव्या मारन नाचली लय भारी, Video 

Kaviya Maran Dancing IPL 2022 RCB vs SRH Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ ६८ धावांत माघारी; SRHची मालकिण काव्या मारन नाचली लय भारी, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 ROYAL CHALLENGERS BANGALORE vs SUNRISERS HYDERABAD Live Updates :  इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या आजच्या सामन्यात RCB ची बेक्कार अवस्था झाली आहे. सनरायझर्स हैदराबाद ( SRH) विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे ( RCB) आघाडीचे ४ फलंदाज २०धावांवर माघारी परतल्यानंतर कोणीतरा त्यांचा डाव सावरेल असे वाटले होते. पण, RCBचा संकटमोचक दिनेश कार्तिकही आज भोपळ्यावर माघारी परतला.     मार्को येनसेन ( Marco Jansen) याने एका षटकात तीन धक्के दिल्यानंतर जगदीशा सुचिथने एका षटकात दोन धक्के दिले. SRHच्या या कामगिरीवर मालकिण काव्या मारन ( Kaviya Maran) खूपच आनंदी झाली. ती चक्क डान्स करताना दिसली. 

मार्को येनसनने दुसऱ्याच षटकात RCBचे ढाबे दणाणून सोडले. त्याने दुसऱ्या चेंडूवर RCBचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसचा ( ५) त्रिफळा उडवला, त्यानंतर विराटला (०) दुसऱ्या स्लिपमध्ये कॅच देण्यास भाग पाडले. या विकेटनंतर स्टेडियमवर शांतता पसरली. विराटही डोकं खाली करून नशीबावर हसला.. त्याच षटकाच्या ६व्या चेंडूवर अनुज रावत ( ०) माघारी परतला. ग्लेन मॅक्सवेल आला आणि फटकेबाजी केली, परंतु टी नटराजनने पाचव्या षटकात त्याची विकेट घेतली. २६ चेंडूंत RCBचे चार स्टार फलंदाज २० धावांवर माघारी परतले.

सुयश प्रभुदेसाई ( १५) संघर्ष करताना दिसला, परंतु ९व्या षटकात जगदीशाने त्याला माघारी पाठवले. त्याच षटकात जगदीशाने RCBचा स्टार दिनेश कार्तिकला भोपळ्यावर बाद केले. शाहबाद अहमद ( ७) व हर्षल पटेल ( ४) यांना अनुक्रमे उम्रान मलिक व टी नटराजनने बाद केल्याने RCBची अवस्था ८ बाद ५५ अशी झाली. टी नटराजन व भुवनेश्वर कुमारने अखेरच्या दोन विकेट्स घेतल्या आणि RCBचा संघ ६८ धावांत माघारी पाठवला.  मार्को येनसेन व टी नटराजन यांनी प्रत्येकी ३, सुचिथने दोन विकेट्स घेतल्या. 

पाहा व्हिडीओ...
 

Web Title: IPL 2022 RCB vs SRH Live Updates : Royal Challengers Banglore are all out on 68; Sunrisers Hyderabad owner Kaviya Maran Dancing video goes viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.