Virat Kohli Golden Duck IPL 2022 RCB vs SRH Live Updates : विराट कोहली सलग दुसऱ्या सामन्यात गोल्डन डकवर गेला, नेटिझन्सनी बघा मीम्सचा धुरळा उडवला 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा Golden Duck वर माघारी परतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 11:03 PM2022-04-23T23:03:30+5:302022-04-23T23:04:09+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 RCB vs SRH Live Updates : Twiteratti React As Virat Kohli Bags Another Golden Duck vs SRH | Virat Kohli Golden Duck IPL 2022 RCB vs SRH Live Updates : विराट कोहली सलग दुसऱ्या सामन्यात गोल्डन डकवर गेला, नेटिझन्सनी बघा मीम्सचा धुरळा उडवला 

Virat Kohli Golden Duck IPL 2022 RCB vs SRH Live Updates : विराट कोहली सलग दुसऱ्या सामन्यात गोल्डन डकवर गेला, नेटिझन्सनी बघा मीम्सचा धुरळा उडवला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 ROYAL CHALLENGERS BANGALORE vs SUNRISERS HYDERABAD Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा Golden Duck वर माघारी परतला. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत मार्को येनसेनने त्याला पहिल्याच चेंडूवर बाद केले. RCBचा संपूर्ण संघ ६८ धावांवर माघारी परतला.  केन विलियम्सन व अभिषेक शर्मा यांनी सहज विजय मिळवून दिला. अभिषेक २८ चेंडूंत ८ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ४७ धावांवर बाद झाला. त्याने केनसह पहिल्या विकेटसाठी ६४ धावा जोडल्या.  राहुल त्रिपाठीने षटकार खेचून हैदराबादचा विजय पक्का केला. हैदराबादने ८ षटकांत १ बाद ७२ धावा करून विजय मिळवला. त्यांनी ९ विकेट्स व ७२ चेंडू राखून हा विजय मिळवला. 

विराटच्या अपयशानंतर फॅन्सने मीम्सचा धुरळा उडवला.   








मार्को येनसनने दुसऱ्याच षटकात RCBचे ढाबे दणाणून सोडले. त्याने दुसऱ्या चेंडूवर RCBचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसचा ( ५) त्रिफळा उडवला, त्यानंतर विराटला (०) दुसऱ्या स्लिपमध्ये कॅच देण्यास भाग पाडले. ६व्या चेंडूवर अनुज रावत ( ०) माघारी परतला. ग्लेन मॅक्सवेल आला आणि फटकेबाजी केली, परंतु टी नटराजनने पाचव्या षटकात त्याची विकेट घेतली.  सुयश प्रभुदेसाई ( १५) संघर्ष करताना दिसला, परंतु ९व्या षटकात जगदीशाने त्याला माघारी पाठवले. त्याच षटकात जगदीशाने RCBचा स्टार दिनेश कार्तिकला भोपळ्यावर बाद केले. शाहबाद अहमद ( ७) व हर्षल पटेल ( ४) यांना अनुक्रमे उम्रान मलिक व टी नटराजनने बाद केल्याने RCBची अवस्था ८ बाद ५५ अशी झाली. टी नटराजन व भुवनेश्वर कुमारने अखेरच्या दोन विकेट्स घेतल्या आणि RCBचा संघ ६८ धावांत माघारी पाठवला.  मार्को येनसेन व टी नटराजन यांनी प्रत्येकी ३, सुचिथने दोन विकेट्स घेतल्या. 
 

Web Title: IPL 2022 RCB vs SRH Live Updates : Twiteratti React As Virat Kohli Bags Another Golden Duck vs SRH

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.