Virat Kohli IPL 2022, RCB vs SRH : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आता प्रत्येक सामना जिंकणे गरजेचा आहे. तिच परिस्थिती सनरायझर्स हैदराबादची आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या RCBला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. विराट कोहली गोल्डन डकवर माघारी परतला. पण, त्यानंतर कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस व रजत पाटिदार यांनी शतकी भागीदारी केली. ग्लेन मॅक्सवेल व दिनेश कार्तिक यांनी तुफान फटकेबाजी केली. या सर्वात कार्तिकच्या आतषबाजीने सर्वांना अवाक् केले, विराट कोहलीनेही यष्टिरक्षक-फलंदाजाला मुजरा केला.
विराट भोपळ्यावर माघारी परतल्यानंतर फफ व रजत यांनी १०५ धावांची भागीदारी केली. रजत ३८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४८ धावांवर बाद झाला. ग्लेन मॅक्सवेल बसरला आणि त्याने २४ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३३ धावा चोपल्या. फॅफ एका बाजूने दमदार खेळत होताच.. त्यानेही ५० चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह नाबाद ७३ धावांची खेळी केली. पण, या सर्वांत कार्तिक उजवा ठरला. त्याने अवघ्या ८ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारासह नाबाद ३० धावा केल्या. यापैकी २२ धावा त्याने अखेरच्या षटकात चोपल्या. राहुल त्रिपाठीने झेल सोडल्यानंतर कार्तिक सुसाट सुटला.
प्रत्युत्तरात केन विलियम्सनही डायमंड डकवर रन आऊट झाला. अभिषेक शर्माही भोपळ्यावर बाद झाला. हैदराबादचे दोन्ही सलामीवीर १ धावेवर माघारी परतले. पण, राहुल त्रिपाठी आज चांगला खेळताना दिसतोय. त्याने एडन मार्करामसह SRHचा डाव सावरला. वनिंदू हसरंगाने त्याच्या पहिल्याच षटकात मार्करामला ( २१) बाद करून मोठा धक्का दिला. हैदराबादची अवस्था ३ बाद ५१ अशी झाली आहे. दरम्यान, पहिल्या डावात वादळी खेळी करून ड्रेसिंग रुममध्ये परतलेल्या कार्तिकसमोर विराट नतमस्तक झाला.
पाहा व्हिडीओ...
Web Title: IPL 2022, RCB vs SRH : Virat Kohli bows down to Dinesh Karthik in RCB Dressing room after his explosive cameo of 30* in just 8 balls, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.