IPL 2022 Retention : इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वासाठी होणाऱ्या Mega Auction मध्ये मोठमोठ्या खेळाडूंवर बोली लागताना पाहायला मिळणार आहे. डेव्हिड वॉर्नरला ( David Warner) IPL 2022 मध्ये संघात कायम केलं जाणार नसल्याचे संकेत सनरायझर्स हैदराबादनं (Sunrisers Hyderabad) दिले होते. त्यामुळे खेळाडू रिटेन करणाऱ्या अखेरच्या दिवशी त्याचं नाव टॉप फोरमधून गायब असेल, ही खात्री सर्वांनाच होती. मंगळवारी आठ संघांनी आपल्या रिटेन करण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली. यामध्ये २७ खेळाडूंचा समावेश आहे. सनरायझर्स हैदराबादनं केन विल्यमसन (१४ कोटी रुपये), उमरान मलिक (४ कोटी रुपये) आणि अब्दुल समद (४ कोटी रुपये) यांना रिटेन केलं आहे.
सनरायझर्स हैदराबादचा यशस्वी फलंदाज डेव्हिड वॉर्नरनं यानंतर आपल्या चाहत्यांचे आभार मानणारं ट्वीट केलं. २०१४ मध्ये सनरायझर्स हैदराबादनं वॉर्नरला संघात घेतलं होतं. त्यानंतर पुढील वर्षी त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. २०१६ मध्ये RCB चा पराभव करत त्याच्या नेतृत्वाखाली संघानं दुसरी ट्रॉफी जिंकली.
"चॅप्टर क्लोस्ड!! सनरायझर्स हैदराबाद आणि सर्व फॅन्सचे इतकी वर्षे पाठिंबा दिल्याबद्दल आभार," असं ट्वीट वॉर्नरनं केलं आहे. वॉर्नरनं हैदराबादसाठी खेळताना ९५ डावांमध्ये ४९.५६ च्या सरासरीनं ४०१४ धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १४२.५९ इतका होता. तीन वेळा ऑरेंज कॅप मिळवणारा तो एकमेव फलंदाज आहे. २०२१ मध्ये झालेल्या आयपीएल सामन्यांदरम्यान त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेत संघाची धुरा केन विल्यमसनकडे सोपवण्यात आली. विल्यमसनला IPL2022 साठी ११ कोटींचा फायदा झालाय. त्याला IPL 2021 साठी ३ कोटी रूपये मिळाले होते.
Web Title: ipl 2022 retention David warner write special message after being released by sunrisers hyderaba
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.