IPL 2022 Retention : इंडियन प्रीमिअर लीग 2022साठी 8 फ्रँचायझींनी आपापल्या ताफ्यात कायम राहणाऱ्या खेळाडूंची अधिकृत घोषणा मंगळवारी केली. रवींद्र जडेजा, रोहित शर्मा व रिषभ पंत हे सर्वाधिक 16 कोटी कमाई करणारे खेळाडू ठरले. पण, पगारवाढीचा टक्का पाहिल्यास वेंकटेश अय्यरनं ( Venkatesh Iyer) सर्वाधिक 4000 टक्के वाढ घेतली आहे. कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) त्याला 8 कोटींमध्ये रिटेन केलं आहे. मागील पर्वात कोलकातानं त्याला 20 लाखांत करारबद्ध केलं होतं आणि आयपीएल 2021मधील कामगिरीमुळे त्याची ही भरघोष पगारवाढ झाली आहे.
एवढी मोठी पगारवाढ झालेल्या अय्यर हा एकटाच खेळाडू नाही, या यादीत अब्दुल समद व उम्रान मलिक यांचाही समावेश आहे. पंजाब किंग्सचा मयांक अग्रवाल यानंही 1 कोटीवरून 12 कोटी अशी झेप घेतली आहे. केन विलियम्सनलाही सनरायझर्स हैदराबादनं 3 कोटींवरून थेट 14 कोटी दिले आहेत. रवींद्र जडेजाला 16 कोटी मिळावे यासाठी महेंद्रसिंग धोनीनं 12 कोटींवर समाधान मानलं.
मालामाल झालेले अनकॅप खेळाडू
- उम्रान मलिन - 10 लाखांवरून थेट 4 कोटी
- अब्दुल समद - 20 लाखांवरून थेट 4 कोटी
अन्य खेळाडूं ज्यांना मिळाली भरघोस पगारवाढ
- वेंकटेश अय्यर - 20 लाखांवरून थेट 8 कोटी
- ऋतुराज गायकवाड - 40 लाखांवरून थेट 6 कोटी
- अर्षदीप सिंग - 20 लाखांवरून थेट 4 कोटी
- पृथ्वी शॉ - 1.2 कोटींवरून थेट 7.5 कोटी
- मोहम्मद सिराज - 2.6 कोटींवरून थेट 7 कोटी
- संजू सॅमसन - 8.5 कोटींवरून 14 कोटी
संघात कायम राखलेल्या खेळाडूंची यादी
- चेन्नई सुपर किंग्स - रवींद्र जडेजा ( 16 कोटी), महेंद्रसिंग धोनी ( 12 कोटी), ऋतुराज गायकवाड( 6 कोटी) , मोईन अली ( 8 कोटी)
- राजस्थान रॉयल्स - सजू सॅमसन ( 14 कोटी), जोस बटलर ( 10 कोटी), यशस्वी जैस्वाल ( 4 कोटी)
- कोलकाता नाइट रायडर्स - आंद्रे रसेल ( 12 कोटी), वरुण चक्रवर्थी ( 8 कोटी), वेंकटेश अय्यर ( 8 कोटी) , सुनील नरीन ( 6 कोटी)
- दिल्ली कॅपिटल्स - रिषभ पंत ( 16 कोटी), अक्षर पटेल ( 12 कोटी), पृथ्वी शॉ ( 8 कोटी), अॅनरीच नॉर्ट्जे ( 6 कोटी)
- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - विराट कोहली ( 15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल ( 11 कोटी), मोहम्मद सिराज ( 7 कोटी); 57 कोटी शिल्लक
- पंजाब किंग्स - मयांक अग्रवाल ( 14 कोटी), अर्षदीप सिंग ( 4 कोटी)
- सनरायझर्स हैदराबाद - केन विलियम्सन ( 14 कोटी), अब्दुल समद ( 4 कोटी), उम्रान मलिक ( 4 कोटी)
- मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा ( 16 कोटी), जसप्रीत बुमराह ( 14 कोटी), किरॉन पोलार्ड ( 6 कोटी), सूर्यकुमार यादव ( 8 कोटी)
संबंधित बातम्या
IPL Mega Auction 2022 साठी पंजाब किंग्सनं वाचवलं सर्वाधिक धन, जाणून घ्या कोणाच्या बटव्यात किती रक्कम