Indian Premier League 2022 Retention Live Updates : महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आयपीएल 2022 खेळणार हे आता निश्चित झाले आहे. चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) आज जाहीर केलेल्या चार खेळाडूंमध्ये धोनीचं नाव दिसल्यानं सर्वांना आनंद झाला. पण, CSKनं जाहीर केलेल्या लिस्टमधून धोनीचा मनाचा मोठेपणा पुन्हा एकदा दिसला. धोनीनं स्वतःचं मानधन कमी करून तो अव्वल खेळाडूचा मान रवींद्र जडेजाला दिला. त्यामुळे CSKनं जाहीर केलेल्या यादीत जडेजा 16 कोटींचा मानकरी ठरला, तर धोनीनं 12 कोटीसह दुसऱ्या स्थानावर राहणे पसंत केलं. मोईन अली ( 8 कोटी) व ऋतुराज गायकवाड ( 6 कोटी) हे संघानं कायम राखलेले खेळाडू आहेत.
महेंद्रसिंग धोनी हा CSKसोबत तीन वर्ष कायम राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले होते. पण, धोनीला रिटेशन लिस्टमध्ये टॉपवर राहायचे नव्हते. आपल्यापेक्षा अन्य खेळाडूला अधिक रक्कम देऊन रिटेन करावे अशी त्याची इच्छा असल्याचे वृत्त समोर आले होते. त्याच्याऐवजी संघ व्यवस्थापनानं इतर खेळाडूला अधिकची रक्कम देऊन संघात कायम राखावे, असं त्यानं फ्रँचायझीला कळवले होते. त्यानुसार हा निर्णय घेतला गेला.
जाणून घ्या टीमनिहाय यादी
- चेन्नई सुपर किंग्स - रवींद्र जडेजा ( 16 कोटी), महेंद्रसिंग धोनी ( 12 कोटी), ऋतुराज गायकवाड( 6 कोटी) , मोईन अली ( 8 कोटी)
- कोलकाता नाइट रायडर्स - सुनील नरीन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्थी, वेंकटेश अय्यर
- सनरायझर्स हैदराबाद - केन विलियम्सन ( 14 कोटी), अब्दुल समद ( 4 कोटी), उम्रान मलिक ( 4 कोटी)
- मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा ( 16 कोटी), जसप्रीत बुमराह ( 14 कोटी), किरॉन पोलार्ड ( 6 कोटी), सूर्यकुमार यादव ( 8 कोटी)
- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - विराट कोहली ( 15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल ( 11 कोटी), मोहम्मद सिराज ( 7 कोटी); 57 कोटी शिल्लक
- दिल्ली कॅपिटल्स - रिषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, अॅनरीच नॉर्ट्झे,
- राजस्थान रॉयल्स - संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जैस्वाल
- पंजाब किंग्स - मयांक अग्रवाल ( 14 कोटी), अर्षदीप सिंग ( 4 कोटी)