IPL 2022 Retention Live Updates : सनरायझर्स हैदराबादनं तगडी जोडी तोडली; डेव्हिड वॉर्नरसह स्फोटक फलंदाजाला केलं रिलीज, राशिद खानलाही वगळलं

IPL 2022 Retention Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वासाठी होणाऱ्या Mega Auction मध्ये मोठमोठ्या खेळाडूंवर बोली लागताना पाहायला मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 08:01 PM2021-11-30T20:01:34+5:302021-11-30T20:08:22+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 Retention Live Updates : Johnny Bairstow, David Warner not retained by SunRisers Hyderabad, batters bid adieu to Orange Army, released Rashid Khan | IPL 2022 Retention Live Updates : सनरायझर्स हैदराबादनं तगडी जोडी तोडली; डेव्हिड वॉर्नरसह स्फोटक फलंदाजाला केलं रिलीज, राशिद खानलाही वगळलं

IPL 2022 Retention Live Updates : सनरायझर्स हैदराबादनं तगडी जोडी तोडली; डेव्हिड वॉर्नरसह स्फोटक फलंदाजाला केलं रिलीज, राशिद खानलाही वगळलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Retention Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वासाठी होणाऱ्या Mega Auction मध्ये मोठमोठ्या खेळाडूंवर बोली लागताना पाहायला मिळणार आहे. डेव्हिड वॉर्नरला ( David Warner) IPL 2022त संघात कायम न राखणार असल्याचे संकेत सनरायझर्स हैदराबादनं ( Sunrisers Hyderabad) दिले होते. त्यामुळे आजच्या खेळाडू रिटेन करणाऱ्या अखेरच्या दिवशी त्याचं नाव टॉप फोअरमधून गायब असेल, ही खात्री सर्वांनाच होती. पण, वॉर्नरसह  SRHनं जॉन बेअरस्टो ( Jonny Bairstow)  यालाही रिलिज केल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

सनरायझर्स हैदराबादनं त्यांच्या सर्व खेळाडूंच्या आभार मानणाऱ्या ट्विटवर वॉर्नर व बेअरस्टो यांनी रिप्लाय दिल्यानं ही दोघं आता पुढील पर्वात हैदराबादच्या ताफ्यात दिसणार नसल्याचे निश्चित समजले जात आहे. SRHनं अद्याप अशी अधिकृत घोषणा केलेली नाही.  SRHनं ट्विट केलं की, अनेक वर्षांपासून SRHच्या प्रवासात हातभार लावणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे आभार. हा अखेरचा निरोप नाही, आम्ही आशा करतो की लिलावात यापैकी काही खेळाडूंना आम्ही ताफ्यात परत घेऊ.
 


या पोस्टवर डेव्हिड वॉर्नरनं रिप्लाय दिला. त्यानं लिहिलं की,''तुम्ही दिलेल्या पाठिंब्याबद्दल तुमचे आभार. मी आणि माझ्या कुटुंबाला तुमच्याकडून किती प्रेम मिळालं हे शब्दात सांगणे अवघड आहे.  कँडीस  व माझ्याकडून SRHच्या चाहत्यांना शुभेच्छा.

बेअरस्टोनंही संघाचे आभार मानले. वॉर्नर व बेअरस्टो जोडीनं २४ डावांत ५८.३७ च्या सरासरीनं १४०१ धावा केल्या आहेत. यामध्ये ७ अर्धशतकी व ५ शतकी भागीदारी आहेत. त्यांनी १८५ धावांची ही सर्वाधिक भागीदारी केली आहे.  वॉर्नरनं २०१६मध्ये हैदराबादला आयपीएल जेतेपद पटकावून दिले होते आणि तीन वेळा ऑरेंज कॅप जिंकली होती. आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहली ( ९७३ धावा) याच्यानंतर वॉर्नरचा ( ८४८ धावा) क्रमांक येतो. 

राशिद खानलाही डच्चू
हैदराबादनं अव्वल फिरकीपटू राशिद खान यालाही रिलीज केल्याची चर्चा आहे. राशिदला रिटेन करण्यात येणाऱ्या चार खेळाडूंमध्ये अव्वल स्थान हवे होते. परंतु फ्रँचायझी व त्याच्यात सकारात्मक चर्चा होऊ शकली नाही.  

सनरायझर्स हैदराबादनं रिटेन केलेले खेळाडू - केन विलियम्सन, अब्दुल समद, उम्रान मलिक 

Web Title: IPL 2022 Retention Live Updates : Johnny Bairstow, David Warner not retained by SunRisers Hyderabad, batters bid adieu to Orange Army, released Rashid Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.