IPL 2022 Retention Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वासाठी होणाऱ्या Mega Auction मध्ये मोठमोठ्या खेळाडूंवर बोली लागताना पाहायला मिळणार आहे. डेव्हिड वॉर्नरला ( David Warner) IPL 2022त संघात कायम न राखणार असल्याचे संकेत सनरायझर्स हैदराबादनं ( Sunrisers Hyderabad) दिले होते. त्यामुळे आजच्या खेळाडू रिटेन करणाऱ्या अखेरच्या दिवशी त्याचं नाव टॉप फोअरमधून गायब असेल, ही खात्री सर्वांनाच होती. पण, वॉर्नरसह SRHनं जॉन बेअरस्टो ( Jonny Bairstow) यालाही रिलिज केल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
सनरायझर्स हैदराबादनं त्यांच्या सर्व खेळाडूंच्या आभार मानणाऱ्या ट्विटवर वॉर्नर व बेअरस्टो यांनी रिप्लाय दिल्यानं ही दोघं आता पुढील पर्वात हैदराबादच्या ताफ्यात दिसणार नसल्याचे निश्चित समजले जात आहे. SRHनं अद्याप अशी अधिकृत घोषणा केलेली नाही. SRHनं ट्विट केलं की, अनेक वर्षांपासून SRHच्या प्रवासात हातभार लावणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे आभार. हा अखेरचा निरोप नाही, आम्ही आशा करतो की लिलावात यापैकी काही खेळाडूंना आम्ही ताफ्यात परत घेऊ.
बेअरस्टोनंही संघाचे आभार मानले. वॉर्नर व बेअरस्टो जोडीनं २४ डावांत ५८.३७ च्या सरासरीनं १४०१ धावा केल्या आहेत. यामध्ये ७ अर्धशतकी व ५ शतकी भागीदारी आहेत. त्यांनी १८५ धावांची ही सर्वाधिक भागीदारी केली आहे. वॉर्नरनं २०१६मध्ये हैदराबादला आयपीएल जेतेपद पटकावून दिले होते आणि तीन वेळा ऑरेंज कॅप जिंकली होती. आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहली ( ९७३ धावा) याच्यानंतर वॉर्नरचा ( ८४८ धावा) क्रमांक येतो.
राशिद खानलाही डच्चूहैदराबादनं अव्वल फिरकीपटू राशिद खान यालाही रिलीज केल्याची चर्चा आहे. राशिदला रिटेन करण्यात येणाऱ्या चार खेळाडूंमध्ये अव्वल स्थान हवे होते. परंतु फ्रँचायझी व त्याच्यात सकारात्मक चर्चा होऊ शकली नाही.
सनरायझर्स हैदराबादनं रिटेन केलेले खेळाडू - केन विलियम्सन, अब्दुल समद, उम्रान मलिक