IPL 2022 Retention : इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वासाठी 8 फ्रँचायझींनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. पंजाब किंग्सनं फक्त दोनच खेळाडूंना कायम राखले, तर सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांनी प्रत्येकी तीन आणि चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी प्रत्येकी चार खेळाडूंना कायम राखले आहे. एकूण 27 खेळाडूंना कायम राखले गेले. लोकेश राहुल, डेव्हिड वॉर्नर, श्रेयस अय्यर, कागिसो रबाडा आदी स्टार खेळाडूंना रिलिज केले गेले. दिल्ली कॅपिटल्सनं माजी कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याला रिलिज केले आणि त्यानंतर अय्यरनं सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ पोस्ट केला.
दिल्ली कॅपिटल्सनं रिषभ पंतला 16 कोटींत संघात कायम राखले. त्यापाठोपाठ अक्षर पटेल ( 9 कोटी), पृथ्वी शॉ (8 कोटी) व अॅनरिच नॉर्ट्जे ( 6 कोटी) या खेळाडूंना दिल्लीनं संघात कायम राखले. दिल्लीच्या खात्यात आता 47.5 कोटी आहेत आणि त्यात त्यांना आयपीएल 2022साठी तगडे खेळाडू खरेदी करायचे आहेत. श्रेयसनं पोस्ट केलेल्या व्हिडीओत त्याच्या दिल्ली कॅपिटल्ससोबतचा प्रवास मांडला आहे. त्यावर पृथ्वी शॉनंही कमेंट करून तुला मिस करू असे लिहिले आहे.
संघात कायम राखलेल्या खेळाडूंची यादी
- चेन्नई सुपर किंग्स - रवींद्र जडेजा ( 16 कोटी), महेंद्रसिंग धोनी ( 12 कोटी), ऋतुराज गायकवाड( 6 कोटी) , मोईन अली ( 8 कोटी)
- राजस्थान रॉयल्स - सजू सॅमसन ( 14 कोटी), जोस बटलर ( 10 कोटी), यशस्वी जैस्वाल ( 4 कोटी)
- कोलकाता नाइट रायडर्स - आंद्रे रसेल ( 12 कोटी), वरुण चक्रवर्थी ( 8 कोटी), वेंकटेश अय्यर ( 8 कोटी) , सुनील नरीन ( 6 कोटी)
- दिल्ली कॅपिटल्स - रिषभ पंत ( 16 कोटी), अक्षर पटेल ( 12 कोटी), पृथ्वी शॉ ( 8 कोटी), अॅनरीच नॉर्ट्जे ( 6 कोटी)
- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - विराट कोहली ( 15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल ( 11 कोटी), मोहम्मद सिराज ( 7 कोटी); 57 कोटी शिल्लक
- पंजाब किंग्स - मयांक अग्रवाल ( 14 कोटी), अर्षदीप सिंग ( 4 कोटी)
- सनरायझर्स हैदराबाद - केन विलियम्सन ( 14 कोटी), अब्दुल समद ( 4 कोटी), उम्रान मलिक ( 4 कोटी)
- मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा ( 16 कोटी), जसप्रीत बुमराह ( 14 कोटी), किरॉन पोलार्ड ( 6 कोटी), सूर्यकुमार यादव ( 8 कोटी)