IPL 2022 Retention : Sunrisers Hyderabad Retained Players : इंडियन प्रीमिअर लीग २०२१मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाची कामगिरी निराशाजनक झाली. त्यामुळे आयपीएल २०२२साठी ते नव्यानं संघबांधणी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. SRHचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर ( David Warner) यानं या फ्रँचायझीकडून खेळणार नसल्याचे स्पष्ट केले नसले तरी SRHत्याला रिटेन करण्याची शक्यता कमी आहे. अशात SRH कर्णधार केन विलियम्सन व अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान याला कायम राखण्यास उत्सुक आहेत. पण, राशिद खाननं फ्रँचायझीची डोकेदुखी वाढवली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार SRH व्यवस्थापन सातत्यानं राशिद खानशी चर्चा करत आहे, परंतु राशिद त्यांचा प्रस्ताव स्वीकारू इच्छित नाही. SRHकडून मिळणाऱ्या पगारावर नाखूश आहे. आयपीएल २०२१पर्यंत राशिदला फ्रँचायझीकडून ९ कोटी वार्षिक पगार मिळत होता आणि आता त्याला त्यापेक्षा अधिक पगार हवी आहे. SRHत्याला १२ कोटी पर्यंत देण्यास तयार आहेत, परंतु राशिदला यापेक्षा अधिक पगार हवा आहे. SRHच्या रिटेन लिस्टमध्ये केन विलियम्सन हा टॉपवर आहे आणि त्याला १६ कोटी देण्यास फ्रँचायझी तयार आहे. पण, राशिदच्या मागणीमुळे केनला दुसऱ्या क्रमांकासाठीच्या खेळाडूसाठी असलेल्या १२ कोटींवर समाधान मानावे लागेल.
आयपीएल रिटेशनचे काही महत्त्वाचे नियम
- ८ फ्रँचायझींना ४ खेळाडूंना कायम राखता येणार आहे. मग त्या चारपैकी ३ भारतीय की १ परदेशी, २ भारतीय की २ परदेशी हा त्या त्या संघांचा निर्णय असेल.
- बीसीसीआयनं ८ फ्रँचायझींना चार खेळाडू रिटेन करण्यासाठी ४२ कोटींचा बजेट दिला आहे. ही रक्कम त्यांच्या सॅलरी पर्समधून वजा केली जाईल. समजा एखाद्या फ्रँचायझीनं चार खेळाडू रिटेन केले तर त्यांच्या पर्समधून ४२, तीन खेळाडू रिटेन केले तर ३३ कोटी, दोन खेळाडू रिटेन केल्यास २४ कोटी आणि एक खेळाडू रिटेन केल्यास १४ कोटी वजा केले जातील. अनकॅप खेळाडूला रिटेन केल्यास ४ कोटी वजा होतील.
- चार खेळाडू रिटेन केल्यास पहिल्या खेळाडूसाठी १६ कोटी, दुसऱ्यासाठी १२, तिसऱ्यासाठी ८ आणि चौथ्यासाठी ६ कोटी मर्यादा घातली गेली आहे. तीन खेळाडू रिटेन केल्यास पहिल्या खेळाडूसाठी १५ कोटी, दुसऱ्या खेळाडूसाठई ११ व तिसऱ्या खेळाडूसाठी ७ कोटी अशी मर्यादा असेल. दोन खेळाडू रिटेन केल्यास १४ व १० अशी अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या खेळाडूसाठी मर्यादा असेल. एकच खेळाडू रिटेन केल्यास तो १४ कोटींच्या आतच करावा लागेल.