Join us  

R Ashwin IPL 2022 RR vs DC Live Updates : आर अश्विनला प्रमोशन मिळाले अन् त्याने दिल्लीला झोडले, देवदत्त पडिक्कलनेही राजस्थानला आव्हानात्मक लक्ष्य उभे करून दिले

IPL 2022 Rajasthan Royals vs Delhi Capitals Live Updates : जोस बटलर व यशस्वी जैस्वाल हे सलामीवीर माघारी परतल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा डाव आर अश्विनने ( R Ashwin) सावरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 9:23 PM

Open in App

IPL 2022 Rajasthan Royals vs Delhi Capitals Live Updates : जोस बटलर व यशस्वी जैस्वाल हे सलामीवीर माघारी परतल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा डाव आर अश्विनने ( R Ashwin) सावरला. तिसऱ्याच षटकात बटलरची विकेट पडल्यानंतर अश्विनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय यशस्वी ठरला. अश्विनने आयपीएलमधील त्याचे पहिले अर्धशतक झळकावताना देवदत्त पडिक्कलसह ( Devdutt Padikkal ) दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. पडिक्कलचे अर्धशतक थोडक्यात हुकले, परंतु राजस्थानने समाधानकारक मजल मारली. 

जोस बटलरला ( ७) आज चेतन सकारियाने तिसऱ्याच षटकात माघारी पाठवले.  RRने धाडसी निर्णय घेताना आर अश्विनला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले आणि त्यानेही काही सुरेख फटके मारले. त्याला रोखण्यासाठी अक्षर पटेलला गोलंदाजीला आणले, परंतु रिषभ पंतनेच झेल सोडला. राजस्थानने पहिल्या पॉवर प्लेमध्ये १ बाद ४३ धावा केल्या. यशस्वी जैस्वाल चांगल्या फॉर्मात दिसत होता, परंतु मिचेल मार्शने त्याला चुकीचा फटका मारण्यास भाग पाडले. जैस्वाल १९ धावांवर बाद झाला. अश्विन व जैस्वाल यांनी ४३ धावांची भागीदारी केली. त्यानंतर देवदत्त पडिक्कल व अश्विन यांनी फटकेबाजी केली. 

अश्विनची स्टाईल पाहून कुलदीप यादवही चक्रावला. नेमकी गोलंदाजी कशी करावी हेच त्याला सुचेना. अश्विननने याचाच फायदा घेताना चांगले फटके मारले. अश्विनने ३७ चेंडूंत आयपीएलमधील पहिले अर्धशतक झळकावले. त्याच्या या खेळीत ४ चौकार व २ षटकारांचा समावेश होता. पण, पुढच्याच चेंडूवर मार्शने त्याची विकेट घेतली. कर्णधार संजू सॅमसन ( ६) व रियान पराग ( ९) हे झटपट माघारी परतले. पडिक्कल एका बाजून चांगला खेळत होता. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या पडिक्कलला एनरिच नॉर्खियाने माघारी पाठवले. ३० चेंडूंत ६ चौकार व २ षटकार खेचून ४८ धावा करणाऱ्या पडिक्कलचा बदली खेळाडू कमलेश नागरकोटीने सुरेख कॅच घेतला. 

दिल्लीच्या गोलंदाजांनी चांगले पुनरागमन करताना राजस्थानची धावसंख्या रोखली. राजस्थानला ६ बाद १६० धावा करता आल्या. चेतन सकारिया ( २-२३), मिचेल मार्श ( २-२५) व एनरिच नॉर्खिया ( २-३९) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. (पाहा IPL 2022 - RR vs DC  सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )

टॅग्स :आयपीएल २०२२आर अश्विनराजस्थान रॉयल्सदेवदत्त पडिक्कलदिल्ली कॅपिटल्स
Open in App