Join us  

KS Bharat IPL 2022 RR vs DC Live Updates : के एस भरतचा आज 'Rohit Sharma' झाला; चेंडू व बॅटचा संपर्क होण्याआधीच अल्ट्राएजचा काटा हलला, Video 

No Ball, Wide Ball इथपर्यंत सुरू असलेला हा वाद तिसऱ्या अम्पायरच्या कचेरीत पोहोचला आहे. तिसऱ्या अम्पायरकडूनही चुका झालेल्या पाहायला मिळतात..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 10:06 PM

Open in App

IPL 2022 Rajasthan Royals vs Delhi Capitals Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात अम्पायरच्या निर्णयांचा खालावलेला स्थर यावरून बराच गदारोळ सुरू आहे. No Ball, Wide Ball इथपर्यंत सुरू असलेला हा वाद तिसऱ्या अम्पायरच्या कचेरीत पोहोचला आहे. तिसऱ्या अम्पायरकडूनही चुका झालेल्या पाहायला मिळतात.. या चुका टाळण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय, परंतु त्यातही त्रुटी सापडत आहेत. त्याचं ताजं उदाहरण द्यायचं झालं तर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातल्या सामन्यातील रोहित शर्माची ( Rohit Sharma) विकेट... चेंडू व बॅट यांच्यात संपर्कच झाला नसताना ultraedgeचा काटा हलला अन् रोहितला बाद दिले गेले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा निर्णय तिसऱ्या अम्पायरने दिला. तसाच प्रकार DC vs RR याही लढतीत झाला. 

प्रथम फलंदाजील आलेल्या राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरला ( ७) चेतन सकारियाने तिसऱ्याच षटकात माघारी पाठवले.  RRने  आर अश्विनला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले आणि त्याने यशस्वी जैस्वालसह ४३ धावांची भागीदारी केली. जैस्वाल ( १९) बाद झाल्यानंतर अश्विन व देवदत्त पडिक्कल यांनी फटकेबाजी केली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली.  अश्विनने ३७ चेंडूंत आयपीएलमधील पहिले अर्धशतक झळकावले. त्याच्या या खेळीत ४ चौकार व २ षटकारांचा समावेश होता. पण, पुढच्याच चेंडूवर मार्शने त्याची विकेट घेतली.

कर्णधार संजू सॅमसन ( ६) व रियान पराग ( ९) हे झटपट माघारी परतले. पडिक्कलने ३० चेंडूंत ६ चौकार व २ षटकार खेचून ४८ धावा केल्या. दिल्लीच्या गोलंदाजांनी चांगले पुनरागमन करताना राजस्थानची धावसंख्या रोखली. राजस्थानला ६ बाद १६० धावा करता आल्या. चेतन सकारिया ( २-२३), मिचेल मार्श ( २-२५) व एनरिच नॉर्खिया ( २-३९) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.  

प्रत्युत्तरात दिल्लीलाही पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टने धक्का दिला. पृथ्वी शॉच्या अनुपस्थितीत संधी मिळालेला के एस भरत ( KS Bharat) दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. पण, तो बाद होता का यावरून वाद सुरू आहे. 

पाहा विकेट..

 

टॅग्स :आयपीएल २०२२दिल्ली कॅपिटल्सराजस्थान रॉयल्सरोहित शर्मा
Open in App